Uncategorized

जिंतूर पोलिसांची अवैध गुटख्यावर धाड

धडक कार्यवाहीत दोन लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त

जिंतूर पोलिसांची अवैध गुटख्यावर धाड
तब्बल दोन लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांची चाहूल लागतात आरोपी फरार
पोलिसांच्या धडक कार्यवाहीने गुटका धाबे दणाणले

जिंतूर —सध्या जिंतूर शहरातील चौका चौकात प्रत्येक पान टपरीवर शासनाने प्रतिबंधीत केलेली विविध कंपन्याच्या सुगंधित सुपार्‍या, विविध कंपन्याच्या गुटक्याच्या पुड्या तसेच कॅन्सर या जीवघेण्या आजाराला निमंत्रण देणारा खर्रा ( गुटका) बिन दिक्कतपणे विकला जात असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येते
याच जीवघेण्या विविध कंपन्याच्या तंबाखू पान सुपारी मुळे तरुणाईत जीव घेण्या कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
या अवैध गुटक्यासंबंधी विविध वर्तमानपत्रातून वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध होत असतातच या सर्वांची दखल घेत स्थानिक पोलीस प्रशासन अलर्ट होत त्यांच्या खबऱ्या कडून विश्वसनीय माहिती भेटताच आज दिनांक 07/11/025 रोजी माहिती काढून धडक कार्यवाही करत सपोनी पुंड,राठोड,पोलिस शिपाई धोत्रे, मपोशी डूबे आदी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीच्या आधारे जफर पठाण रा.पठाण मोहल्ला जिंतूर यांच्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून शासकीय पंचासह नमूद आरोपीच्या घरी जाऊन धाड टाकले असता संबंधित आरोपी हा पोलिसाला पाहून घराच्या छतावरून पळून गेला सदरील आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या मानवी आरोग्यास घातक असलेल्या व कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला आमंत्रित करणाऱ्या प्रतिबंधित गुटक्याच्या एकूण दोन लाख 72 हजार 858 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी देवाशीस बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखालील सपोनी पुंड,चव्हाण पोलीस हवालदार राठोड,जाधव, वाटोडे वाघमारे ,धोत्रे यांनी ही धडक कारवाई करत यशस्वी मोहीम राबवली.
पोलिसांच्या या धडक कारवाईचे शहरातील सुजाण नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
भविष्यात सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाने अशीच अवैध गुटख्याच्या विरोधात धडक व कडक मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.
या धडक कारवाईमुळे शहर व तालुक्यातील संबंध अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
@चौकट@
भविष्यात सुद्धा अवैध धंदे व गुटख्या माफियांच्या विरोधात अशीच धडक कारवाई राबविण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली.
जिंतूर शहर व तालुक्यात शांतता अबाधित राहण्यासाठी सुजाण नागरिकांनी वेळोवेळी पोलिस प्रशासच्या संपर्कात राहून कुठेही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसासी तात्काळ संपर्क साधून शहरातील शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गजेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!