Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून सबीया बेगम फारुकी यांची नगराध्यक्ष पदासाठी घोषणा

“राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी – साबिया बेगम कपिल फारुकी

निष्ठावंत कार्यकर्ता स्व.कपिलभाई फारुकी व हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठीची हि निवडणूक – मा.आ.विजय भांबळे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सेक्युलर पार्टी — मा.आ.विजय भांबळे

जिंतूर :- ०७ नोव्हेंबर, नगर परिषद जिंतूर निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी साबिया बेगम कपिल फारुकी यांची उमेदवारी निश्चित केल्याची घोषणा आज मा.आ.विजयराव भांबळे यांनी केली. मागील नगराध्यक्ष पदाचा राजकीय अनुभव व प्रशासन चालवण्याचा दीर्घ अनुभव, मुस्लीम व हिंदू समाजात बंधूभाव, सर्व धर्म समभाव, महिलांमध्ये लोकप्रियता असलेल्या सबिया बेगम कपिल फारुकी यांच्या उमेदवारिची घोषणा करण्यात आली.
यावेळी मा.आ.विजयराव भांबळे यांनी मत व्यक्त करताना सांगितले कि, ही निवडणूक आम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ता स्व.कपिलभाई फारुकी यांच्या साठी लढवतोय कपिलभाई यांचे उभे आयुष्य हिंदू-मुस्लीम एक्यासाठी खर्च झालेले आहे. ⁠आमच्या भाभी ज्यांना आम्ही तिकीट देतोय त्या पैशानी किंवा प्रॅापर्टी मोठ्या नाहीत आम्ही तिकीट देतोय ते त्यांच्या निष्ठेसाठी, हिंदू-मुस्लीम एक्यासाठी. आमच्या कडे घरचे माझे बंधू बाळासाहेब भांबळे हे उमेदवार होते पण मी त्यांना न देता ज्यांनी हिंदू मुस्लीम ऐक्य साधले, सर्व हिंदू आसू कि मुस्लीम घराघरात ज्याचे जिव्हाळ्याचे संबध होते अश्या कै. कफिल फारुकी याच्या स्मरनार्थ त्याच्या घरच्यांना तिकीट देतोय. ⁠जिंतूर शहरात हिंदू मुस्लीम सलोख टिकला पाहीजे हा माझा उद्देश आहे असे मत व्यक्त केले.
नगराध्यक्ष पदासाठी मुस्लीम समजातून मुस्लीम उमेदवार देण्यात यावा हि मागणी मोठ्या प्रमाणात होती तिचा विचार करून मा.आ.विजयराव भांबळे यांनी सर्व जनतेच्या मनातील उमेदवार दिला असल्याचे जाहीर केले. यावेळी उपस्थित मुस्लीम बांधवांनी साबिया बेगम कपिल फारुकी यांना एकमताने पाठीशी असल्याची उमेदवारी निश्चित होताच घोषणा केली.

  राष्ट्रवादी पार्टी अजित पवार हा सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन संविधानावर विश्वास ठेवणारा सेक्युलर पक्ष असल्याचे सांगत त्यांनी असेही जाहीर केले की लवकरच प्रभागनीहाय नगरसेवकांची घोषणा लवकरच करणार असल्याचे स्पष्ट केले.कारण प्रत्येक प्रभागातून राष्ट्रवादी पार्टी कडून असंख्य उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये तीन वर्षापासून नगरपालिकेच्या कारकिर्दीवर टीका करत दिवंगत कपिल फारोखी यांच्या काळात शहरातील चौफेर केलेल्या विकास कामाची त्यांनी यावेळी माहिती सुद्धा दिली.
यावेळी साबिया बेगम कपिल फारुकी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, विश्वनाथ राठोड, केशवराव बुधवंत, रामराव उबाळे, मनोहर डोईफोडे, दत्तराव काळे, संजय निकाळजे, शाहेद बेग मिर्झा, दलमीर पठाण, शोएब जानिमिया, आहेमद बागबान, छोटू भाई, शौकत लाला, अक्कू लाला, गजानन रोकडे, अरुण घुगे, शिवा गवळी, नागेश पुणेकर, कांतराव धानोरकर, मकसूद पठाण, आत्माराम मेहेत्रे, मेहराज पठाण, बारी सर, सादेक सर, खयुम कादरी, सलीम सर, सचिन स्वामी, संदीप राठोड, अविनाश मस्के, रुपेश चिद्रवार, अभिजित भांबळे, विजय खिस्ते, राजेश चव्हाण, दीपकशेंद्रे, अमित राठोड, कैलास महाराज देशमुख, वासेफोद्दिन काझी, सलीम भाई, , रोहिदास राठोड, हकीम लाला, बाबूभाई, आशाताई खिल्लारे, शंकर गंजे, हबीब भाई, मोसिन भाई, मोसिन मिर्झा, रियाज पठाण, सुलेमान सिद्धिकी, माजीद खां पठाण यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!