भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या सचिव पदी आवेस पठाण आफ्रेदी यांची नियुक्ती

भाजपच्या परभणी जिल्हा सचिव पदी आवेस खान पठाण
यांची नियुक्ती
जिंतूर :: येथे पोद्दार इंग्लिश स्कूल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मा. श्री. रामप्रसाद जी बोर्डीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना. सौ. मेघना दिदि साहेब बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश आणि पद नियुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तरी या कार्यक्रमात बोर्डीकर परिवाराचे विश्वासु आणि कट्टर समर्थक कार्यकर्ते आवेस भाई पठाण आफ्रि़दी यांची माजी आमदार बोर्डीकर आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भूमरे यांच्या हस्ते पत्र देउन परभणी जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा “सचिव पदी” निवड करण्यात आली आहे.
तरी यावेळी व्यासपिठावर जिंतूर विधानसभा निवडणुक प्रमुख डॉ. पंडित दराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसादराव बुधवंत,जिंतूर तालुका अध्यक्ष गोविंद थिटे पाटील, अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष मतीन तांबोळी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष लालु खान पठाण, जिल्हा अल्पसंख्याक सदस्य जमील कुरेशी पुर्णा हे सर्व उपस्थित होते.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जिंतूर तालुक्यातील नागरीकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या पदावर नियुक्त्या देखील करण्यात आले आहे तरी यावेळी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तरी बोलत असताना बोर्डीकर साहेबांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद वर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवण्याचा ध्यास आणि ध्येय मनात ठेवून कामाला लागा असे आवाहन केले आणि सर्व नवीन पक्षप्रवेश केलेल्या आणि पक्षाच्या पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या या सर्वांचे अभिनंदन केले.




