भोगाव (देवी) साठी एसटीची नवरात्र देवी दर्शन सेवा उपलब्ध: आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण

भोगाव (देवी) ला एसटीची नवरात्र देवी दर्शन सेवा उपलब्ध — आगार व्यवस्थापक चव्हाण
भक्तजनांनी अवैध प्रवास प्रवास टाळावा
जिंतूर — नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीचे ठाण तालुक्यातील भोगाव (देवी) येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एसटी महामंडळाने विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रा सुरू केली आहे.
भक्तांनी माफक दरात व सुरक्षित प्रवासा साठी एसटी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी केले आहे.
त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की जिंतूर आगारातून नियमित तीन फेऱ्या जिंतूर वरून भोगाव (देवी) साठी सुरू केल्या असून भक्तांची गर्दी पाहता पुन्हा जास्तीत जास्त फेऱ्या वाढवण्यात येतील असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
गत वर्षी जिंतूर आगारातून तब्बल 166 फेऱ्या केल्या होत्या.भक्तांचा गत वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला होता.
प्रवासी वर्गाने विशेषतः एसटीनेच प्रवास करावा एसटीचा प्रवास हा सुरक्षित व माफक दरात असून महाराष्ट्र शासनाच्या विविध सवलती फक्त एसटी महामंडळ देऊ शकते. भक्त जणांनी अवैध वाहतूकने प्रवास करणे टाळावे असेही आव्हान आगार व्यवस्थापक आनंद चव्हान यांनी केले आहे.




