Uncategorized

कोणत्याही आतंकवाद्यास धर्म नसतो-पठाण हाकिम खान

पहेलगाम भ्याड नरसंहाराचा निषेध करत प्रधासनास दिले निवेदन

जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे)—कोणत्याही आतंकवाद्यास धर्म नसतो.आतंकवादी हा फक्त आतंकवादी असतो अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकृत्ये पठाण हाकीम खान तय्युब खान यांनी दिली.कश्मीरच्या पहेलगाम येथे अमानुषपणे आतंकवाद्यानी घडवलेल्या नरसंहाराच्या निषेधार्थ स्थानिक सामाजिक कार्यकृत्ये पठाण हाकीम खान स्थानिक प्रशासनास निवेदन दिल्या नंतर पत्रकाराशी संवाद साधतांना आपले मत व्यक्त करत होते.
त्यांनी पुढे असेही सांगितले की घडलेली घटना निश्चितच मनाला चीड आणणारी असून सरकारने आतंकवाद्याचा समूळ खातमा करण्यासाठी तातडीने पावले उचलावी. देशातील हिंदू मुस्लिम एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहत आलेली आहेत. व नेहमी राहतील. अशी घडल्यास राजकर्त्यांनी त्याचे भांडवल न करता देशातील हिंदू मुस्लिम पुन्हा घट्ट एकत्र कसे राहतील या कडे जास्त लक्ष देण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.काश्मीर मधील पहेलगाम येथील घोडेस्वारी करून आपली उपजीविका करणारा सय्यद अली शाह आपले बलिदान देत असंख्य लोकांचे जीव वाचविले.त्यांनी या कडे सरकारचे लक्ष वेधत पर्यटकांचे प्राण वाचवताना त्याने जे बलिदान दिले.त्यास सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी अशीही मागणी पठाण हाकीम यांनी केली.
या वेळी त्यांच्या समवेत असलम कुरेशी,शेख मुखीद,मतीन बेग, अखलाक काजी,अली चाऊस,फिरोज खान शाकेर पठाण आदींचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button