
भाऊबीजेस निराधार महिलेस शेळी व करडू भेट
एचएआरसी संस्थेने जपली सामजिक बांधिलकी
@भाऊबीज सणाच्या निमित्ताने निराधार ताईला दिले उदरनिर्वाहाचे साधन
जिंतूर (ता. 23ऑक्टोंबर ) :
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे भाऊबीज सणानिमित्त जिंतूर तालुक्यातील वरूड नृसिंह येथील निराधार विधवाताई पार्वती ईखे यांना उदरनिर्वाहासाठी शेळी व करडू भेट देण्यात आले. या उपक्रमावेळी एचएआरसी अध्यक्ष डॉ. पवन चांडक, समन्वयक प्रकाश डूबे, ऍड चंद्रकांत राजुरे, संतोष बारबिंडे आदी उपस्थित होते.
*पार्श्वभूमी*:
जिंतूर तालुक्यातील वरुड नृसिंह येथील रहिवासी असलेल्या पार्वती आसाराम ईखे यांच्या पतीचे 2011 मध्ये दुर्दैवी निधन झाल्यावर त्यांना वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी वैधव्य नशिबी आले.पतीच्या दुर्देवी मृत्यूनंतर सासरचा आधार गेला. त्या सध्या एकट्या राहत असून त्यांना दोन मुली असून त्या बारावी आणि दहावीत शिकत आहेत.त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. दुःख बाजूला सारून रोज शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत तसेच शिक्षणाचा खर्च भागवत आहेत त्यांच्या या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची दुःखद व्यथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुंगळाचे शिक्षक प्रकाश डूबे यांनी भेट घेऊन जाणून घेऊन कैफियत एच.ए.आर.सी. संस्थेकडे मांडून त्या ताईंना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व करडू भेट देण्याचे आवाहन केले होते. एका निराधार ताईच्या घरी आगळीवेगळी भाऊबीज साजरी केल्याबद्दल समाजातून उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.




