Uncategorized

जि.प.निवडणूक भाजपच्या प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

जिल्हा परिषद निवडणूक भाजपच्या प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सरळ लढतीचे चित्र

जि.प. सर्कल मध्ये नाव घोषित करण्यास राष्ट्रवादीची सरशी दहा उमेदवाराची घोषणा

मा.आ.विजय भांबळे,सुरेश नागरे यांची भक्कम युती भाजपला कडवट लढा देण्याची शक्यता

जिंतूर::: नुकतीच राज्यात नगर पालिका निवडणूक संपलेली असताना सध्या राज्यातील महानगर पालिकेची रणधुमाळी सुरू आहे.
लवकरच प्रलंबित असलेली मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक घोषित झाली असून
या निवडणुकीत पुन्हा महायुतीतील दोन गट भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमने-सामने होण्याची शक्यता आहे.भाजपने शहरी भागात नगरपालिकेच्या निवडणुकीत बहुसंख्य असलेल्या मुस्लिम बांधव पाहता 12 उमेदवार उभे करत नगर पालिका ताब्यात घेत एकतर्फी विजय 25 पैकी 16 नगरसेवक व नगर अध्यक्ष निवडून आणला. या प्रतिष्ठेच्या पालिका निवडणुकीत माजी आमदार विजय भांबळे व सुरेश नागरे यांची एकत्रिक ताकद कमी पडली.विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जंगी सभा ही संपन्न झाली होती. विशेषता या सभेत ज्या गोष्टीची शंका अजित पवार यांनाही होती की मुस्लिम मते विभागली जाऊ नये म्हणून त्यांनी उपस्थित जनसमुदायास विशेषता मुस्लिम समुदायास आव्हान केले की मत विभागणी करणाऱ्याचे डिपॉझिट जप्त करा. पण तसे काही झालेले नाही त्याचाच फटका राष्ट्रवादी गटात बसल्याचे स्पष्ट झाले. येथे काँग्रेसचे शेख इस्माईल सलीम पहेलवान यांनी तब्बल अध्यक्ष पदासाठी 6299 मतेच घेतली नाही तर चार नगरसेवक सुद्धा काँग्रेसचे निवडणून आणून राजकीय पटलावर काँग्रेस जिवंत आहे.हे दाखवून दिले.
या सर्व मुस्लिम मुस्लिम मत विभागणीत नक्कीच माजी आमदार विजय भांबळे यांना जबर फटका बसला.येथे भाजपचे उमेदवार प्रताप देशमुख यांना 13122 मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाच्या पदाच्या उमेदवार सबीया बेगम फारुकी यांना 9955 मते पडले व त्यांचा 3167 मतांनी पराभव झाला.येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ पाच नगरसेवक विजयी झाले.
=======================
जिल्हा परिषद निवडणुकीत
भाजपची कसब लागणार

जिल्हा परिषद राष्ट्रवादीचा गड भाजप भेदणार का
=======================
जिंतूर सेलू मतदार संघात 15 गट असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर पंधरापैकी तेरा जिल्हा परिषदेवर माजी आमदार विजय भांबळे यांची जादू चालली होती. त्यांचे तब्बल 15 पैकी 13 जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले होते. तर शिवसेना गटाचे दोन सदस्य निवडून आले होते.
=======================

गत निवडणुकीतील जिल्हा
परिषदेमधील पक्षीय बलाबल

@जितुर::सेलू तालुका@
विजयी उमेदवार
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ममता मुरलीधर मते (राष्ट्रवादी काँग्रेस),( वझर बुद्रुक ),उज्वला विश्वनाथ राठोड (राष्ट्रवादी काँग्रेस,(वाघी धानोरा),इंदुबाई आसाराम घुगे (राष्ट्रवादी काँग्रेस)(सावंगी म्हाळसा)
अरुणा अविनाश काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)(आडगाव बाजार) नमिता संतोष बुधवंत (राष्ट्रवादी काँग्रेस)(भोगाव देवी),संगीता विठ्ठल घोगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) (वरुड),मिना नानासाहेब राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस)(चारठाणा),अजप अशोकराव चोधरी (राष्ट्रवादी काँग्रेस) (बोरी),शालीनी शिवाजीराव राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस)(वसा),रामराव अर्जुन उबाळे,(राष्ट्रवादी काँग्रेस)(चिकलठाणा बु. ता. सेलू ),राजेंद्र राधाकिशन लहाने (राष्ट्रवादी काँग्रेस),(वालुर ता. सेलू )
अशोक आण्णासाहेब काकडे
(राष्ट्रवादी काँग्रेस),( कुपटा ता. सेलू )
इंद्रायणी बालासाहेब रोडगे, (राष्ट्रवादी काँग्रेस),(रवळगांव ता. सेलू ),बेबीनंदा प्रभाकर रोहिणकर (शिवसेना)(कौसडी ता. जिंतूर),राम सुखदेव पाटील (शिवसेना),(देउळगाव गात ता. सेलू) अशा पद्धतीने पक्षी बराबल जिल्हा परिषद गटात होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
वरील अशोकराव काकडे राष्ट्रवादीला चिडचिठ्ठी देत नुकतेच भाजपमय झाले.
आता चित्र वेगळे दिसून येते.बोर्डीकर परिवार भाजपवाशी झाल्याने कार्यसम्राट मेघना बोर्डीकांनी दुसऱ्या वेळी भाजप तिकीटावर आपल्या कर्तृत्वावर विजय मिळवला आहे.केलेली विकास कामे व भाजपची देशात राज्यात चाललेली विकासकामांची घोडदौड ही जमेची बाजू होताना दिसून येत आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या.
राज्यात येथेही भाजपची सरशी झाली असून प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबईची बिएमसी सुद्धा भाजपने सर केली.
परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावत 37 उमेदवार उभे केले. व 12 जागी विजय मिळवण्यात यश आले.
आता जिंतूर सेलू मतदारसंघात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी पार्टी कडवी झुंज दिसणार आहे.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर पालकमंत्री मेघना बोर्डीकर व राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे व सुरेश नागरे यांच्यात सामना रंगणार असे चित्र आहे.
सध्या परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुजाती साठी आरक्षित झालेले असून राष्ट्रवादी कडून माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रामराव उबाळे,भाजप कडून माजी जिप सदस्य विजयी वाकळे,माजी सरपंच रवी रनबावळे, गडदगव्हानचे डॉ.संजय खिल्लारे,आदी नावे चर्चेत असल्याचे समजते.
यावेळी भावी उमेदवार घोषित करण्यास राष्ट्रवादी सरस ठरली असून त्यांनी आपले जिंतूर तालुक्यात पाच व सेलू तालुक्यात पाच अशी एकूण 10 उमेदवार घोषित केले आहेत.
यात जिंतूर तालुक्यातून बोरी= सर्कल साठी सौ.दिपाली अजयराव चौधरी, सावंगी (म्हा)=वनिता रामराव उबाळे,वाघी विश्वनाथ प्रभाकर राठोड, भोगाव=कृष्णकांत शिवाजीराव मोरे,आडगाव=माधव रंगनाथ घोगरे,तर सेलू तालुक्यात रवळगाव सर्कल= राजेंद्र काका लहाने,वालूर=राम नाना खराबे, चिकलठाणा=पुरुषोत्तम अण्णा पावडे,देऊळगाव=नामदेव अप्पा डख, कुपटा=प्रकाश मुळे आदींच्या नावांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने करून उमेदवारी घोषित करण्यास आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!