अर्जुन वजीर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिव पदी निवड
जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे)–अर्जुन वजीर यांची जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिव पदी निवडकरण्यात आली.
जिंतूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत यांनी त्यांना पत्र देऊन अर्जुन वजीर यांची निवड करण्यात आल्याचे कळविले आहे.
अर्जुर वजीर हे गणपुर येथील रहिवासी असून ते माजी पंचायत समिती सदस्य आहेत व बोरी येथील मार्केट कमिटी संचालक पदावरही होते.
अर्जुन वजीर हे धनगर समाज उन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष आहेत. व गणपुर ग्रामपंचायत वर सलग पंधरा वर्षे त्यांचेच वर्चस्व आहे. ते या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष होते. तर आता त्यांची सचिव व सेक्युरिटी म्हणून निवड करण्यात आली आहे.या निवडीचे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.