Uncategorized

उबाठा शिवसेना गटातर्फे मराठवाड्याचा हंबरडा धरणे आंदोलन:: नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी दिले निवेदन

उबाठा शिवसेना गटातर्फे मराठवाड्याचा हंबरडा लक्षवेधी धरणे

निवेदनाद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध मागण्याचे निवेदन

जिंतूर::: अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी जिंतूर तहसील कार्यालया पुढे उबाठा शिवसेना गटातर्फे मराठवाड्याचा हंबरडा धरणे आंदोलन करण्यात आले दिलेल्या निवेदनात पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटून या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट या संकटामुळे उत्पादित खर्चातील वाढ महागडी खते औषधे यामुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे पिकांचे भाव हमीभाव अपेक्षा कमी मिळत आहे उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे शेतकरी व ग्रामीण भागाचे उपयोगाचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पांना हमीभाव योग्य बाजार नसल्याने बहुतांशी शेतकरी बँक व खाजगी सावकाराकडील कर्जाच्या ओजाखाली दबले गेले आहेत आणि त्यांना थकबाकीमुळे नोटीस जप्ती कारवाई काही कडून तर सातमातेचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे दिवसेंदिवस यासंबंधी आकडे वाढलेले असेही निवेदनात नमूद केले असून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर यामध्ये थकबाकीदार चालू बाकी दार यांच्यासह अल्प मुलींचे पीक कर्ज मध्य मुदतचे सिंचन व उपकरण कर्ज शेडनेट पोली हाऊस दूधउत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यातून समाविष्ट करण्यात यावी.
या मागण्यासह अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये इतकी थेट अर्थ मदत त्वरित जाहीर करावी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्त करावे, पिक विम्या साठी कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनामाची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी,अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे जे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा.
आदी मागण्या प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आलेले आहेत. यावेळी बंडू लांडगे, गंगाप्रसाद घुगे, रामजी शर्मा सुरेखाताई शेवाळे,अरविंद कटारे अरुण चौधरी या सह शिवसैनिक व शेतकरी यांची उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!