पोलीस पाटील संघाच्या वतीने पोनी गजेंद्र सरोदे सन्मानित

पोलीस पाटील संघाच्या वतीने जिंतूरचे पोलीस निरीक्षकांना सन्मानपत्र देऊन सन्मानित
जिंतूर::महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ,जिंतूर यांच्यावतीने जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना उत्कृष्ट व उपक्रमशील कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.”डीजेमुक्त गणेशोत्सव व नवरात्रौत्सव” हा परभणी पोलीस दलाचा महत्वकांक्षी उपक्रम यशस्वीपणे राबवला. जिंतूर पोलीस ठाण्यात रोजी झाल्यानंतर अल्पावधीतच कायदा,सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत.
तसेच पोलीस प्रशासनात सुसंवादी पालक अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.
पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या उपक्रमशील कार्याचा सन्मान म्हणून पोलीस पाटील संघाच्या वतीने सविनय सन्मानपत्र देऊन
सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस पाटील संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर राऊत, जिल्हा सहसचिव उद्धव दराडे, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुजाता वानखेडे भिसे, महिला तालुकाध्यक्षा शितल पंढरकर ससे,स्टेशन अध्यक्ष जगन्नाथ कुहिले,अंबादास जगताप, उत्तम गायकवाड, दत्ता लिंबाळकर, सविता धनगर, करुणा कवडे,शिवकन्या भांडेकर वाकुडे, रेखा शेळके व सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.




