नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी आर्थिक मदत जमा करा::उबाठा शिवसेना गटाची प्रशासनाकडे मागणी
तत्काळ आर्थिक मदत जमा न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ आर्थिक मदत जमा करा – उबाठा शिवसेना गटाची मागणी
दिवाळी पुर्वी मदत न भेटल्या शिवसेना आंदोलन करणार
जिंतूर – सप्टेंबर महिना झालेल्या अवकाळी पावसा मुळे झालेले शेती पिकांचे नुकसान तसेच जनावरे वाहून गेले आहेत पशुखाद्य वाहून गेले आहे या संदर्भात शिवसेनेने आत्तापर्यंत अनेक आंदोलन केले आहेत याचा पाठपुरावा म्हणून शासनाने शेतकऱ्यांना निधी वाटप करणे संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय यांना सूचना दिल्या होत्या परंतु काल आलेल्या नवीन जीआर नुसार हे शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मिळणारे पैसे परत लांबण्याची शक्यता असताना उबाठा शिवसेना गटातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी पुढाकार घेत दिवाळी हा मोठा सण असून या सणाला तरी आपण शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई खात्यात जमा करून त्यांना मदत करावी ही मागणी केली असून कार्यालयाला आलेल्या सुट्ट्या थांबवून आपण या शेतकऱ्यांना आलेल्या निधी त्वरित खात्यात वळता करून द्यावा अशी मागणी निवेदनात नमूद असून दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम निधी जमा झाला नाही तर शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल हा इशारा या निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर,सुरेखा शेवाळे टाले उपजिल्हाप्रमुख (उबाठा शिवसेना पक्ष,अरविंद कटारे (शहर प्रमुख शिवसेना,उबाठा पक्ष) बंडू लांडगे (उपजिल्हाप्रमुख),राम शर्मा (तालुकाप्रमुख) ,गंगाप्रसाद घुगे (जिल्हा समन्वयक) आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



