Uncategorized

भोगाव देवी परिसरातील इटोली शिवारात तरुणीवर सामूहिक अत्याचार:: पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

इटोली शिवारात तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना

पोलिसांना कुणकुण लागताच – आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांच्या तत्पर कारवाईने तरुणीवर सामूहिक अत्याचार करणारे नराधम गजाआड

जिंतूर- – जिंतूरच्या स्थानिक पोलिसांच्या गतिमान आणि प्रभावी कारवाईमुळे तरुणीवर अत्याचार करणारे नराधम अखेर पोलिसांच्या ताब्यात आले असून त्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील इटोली शिवारात एका 18 वर्ष तरुणीवर युवकांच्या टवाळखोर टोळक्यांनी सामूहिक अत्याचार करत अमानवीय व माणुसकीला काळीमा फासणारी कृत्य केले.
या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.

या प्रकरणात पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनिवाल, पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, स्थायी गुन्हे शाखेचे निरीक्षक पाटील, तसेच सपोनि पुंड यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकारी स्वतः रात्रभर ठाण्यात राहून तपासाचे मार्गदर्शन करत होते. पोलिसांच्या या सततच्या प्रयत्नांमुळे आरोपींना अवघ्या काही तासांत गजाआड करण्यात आले.

मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास १२ वाजता भोगांव देवी संस्थानच्या इटोली शिवारात ही धक्कादायक घटना घडली. एक तरुणी आणि तिचा मित्र झाडाखाली गप्पा मारत बसले असताना परिसरातील विकृत मनोवृत्तीच्या काही आरोपींनी त्या दोघांना एकांतात पाहून संगनमताने तरुणीवर जबरदस्ती अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर या अमानुष कृत्याची आरोपींनी व्हिडिओ चित्रफीत तयार करून त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांना मिळताच जिंतूर पोलिसांनी वेगवान तपासाची चक्रे फिरवली.

घटनेनंतर पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला. अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनिवाल यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि विशेष पथकाला आरोपींच्या शोधासाठी तत्काळ रवाना केले. या पथकात पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, स्थागुशा निरीक्षक पाटील, सपोनि पुंड, पोलीस हवालदार गुणगाने, वाघमारे, जिल्हा विशेष शाखेचे पो. ह. जिया खान, माणिक डुकरे, स्थागुशाचे राम पोळ, नामदेव दुबे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, सिद्धेश्वर चाटे, सापोनी कावळे आणि पुंगळे मॅडम आदींचा समावेश होता. सर्व पथकांनी समन्वय साधून आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मोहिमेत आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणात पोलिसांनी करण (रा. डोंगरतळा), साबेर (वय २०, रा. भोगांव) आणि शेषराव (वय ३५, रा. भोगांव) या तिघांना अटक केली असून, तर चित्रफीत तयार करणाऱ्या इतर तिघा आरोपींना ही ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध बलात्कार, धमकी व अश्लील सामग्री तयार केल्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी पीडित तरुणीला त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. तिचा जबाब संवेदनशीलतेने नोंदवण्यात आला. पुरावे गोळा करून संपूर्ण प्रकरण अत्यंत दक्षतेने हाताळण्यात आले. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे. दरम्यान, पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक सहभागामुळे पोलिस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. “आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व पुरावे सादर केले जातील,” असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात जिंतूर पोलिसांनी दाखविलेली संवेदनशीलता, जबाबदारी आणि चोख कारवाई समाजासाठी आदर्श ठरल्याचे नागरिकांकडून गौरवले जात आहे.

पोलिस प्रशासनाने अगदी वेगाने तपास यंत्रणा राबत नराधम आरोपी जेरबंद करत त्यांना माननीय परभणी येथील न्यायालयात पुढील कारवाईसाठी कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!