सरपंच संतोष देशमखांच्या हत्यारांना तत्काळ फाशी द्या–सकल मराठा
जिंतूर बाजारपेठ शनिवारी बंद!!!

जिंतूर-( गुणीरत्न वाकोडे)
— बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असून, त्याला मदत करणाऱ्या धनंजय मुंडे यांचाही या प्रकरणात समावेश करावा, फास्ट कोर्टामार्फत सर्वांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे .या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज जिंतूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवार, 8 मार्च रोजी जिंतूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिंतूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवावा व सकल मराठा समाजाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाईची अपेक्षा होत असून, या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.