
छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन
मानवत—शहरातील बुद्ध नगरातील संताई बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमा. दरम्यान संताई बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा जया संतोष भदर्गे यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या समाजकार्याच्या कार्यास उजाळा देत उपस्थित महिला मंडळास मोलाचे मार्गदर्शन केले.
या अभिवादन कार्यक्रमा दरम्यान जया संतोष भदर्गे यांच्या सह संस्थेचे सचिव हरिषचंद्र काकडे,कोषाध्यक्ष मनीषा कांबळे व असंख्य महिला मंडळाची उपस्थिती होती.