अंबरवाडीच्या जि. प. के.प्रा.शाळेत एच.ए.आर.सी.संस्थे तर्फे 125 पुस्तकांची आनंद वाचन पेटीची अमूल्य भेटर्फे स
तुकाराम बीज निमित्त एच.एच.ए.आर.सी.च्या तर्फे संस्थे स्तुत्य उपक्रम

जिंतूर–( गुणीरत्न वाकोडे)–आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनुसार शब्दांची शस्त्रे करण्यासाठी पुस्तक वाचणे काळाची गरज आहे .त्यामुळे आज ता. 16 मार्च रोजी जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंबरवाडी येथे तुकाराम बीज निमित्त आनंदी वाचनपेटी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हनुमान घुगे तर प्रमुख पाहुणे म्हणून एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, उपाध्यक्ष डॉ. शैलेश मंत्री, समन्वयक प्रकाश डूबे, राजेंद्र खापरे, श्रीया मंत्री हे उपस्थित होते.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना प्रकाश डूबे यांनी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या वतीने या शाळेला 130 वी आनंदी वाचनपेटी भेट देण्यात येत असून संस्थेमार्फत आतापर्यंत नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड व पुणे जिल्ह्यातील 129 शाळांना ही आनंदी वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आल्याचे सांगितले.
डॉ.पवन चांडक यांनी मनोगत व्यक्त करतांना”ससा आणि कासव यांची गोष्ट मोबाईल पाहणारा आळशी ससा तर नियमितपणे वाचन व व्यायाम करणारा कासव यांच्या स्पर्धेत कासवाचा कसा विजय होतो हे सांगत विद्यार्थ्यांना चांगले चरित्र घडविण्यासाठी 30 चांगल्या सवयींचा अंगीकार करून जीवन समृद्ध करण्यास सांगितले.
विलास मामडे यांच्यातफे वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली यामध्ये 125 पुस्तके असून यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, महापुरुषांची चरित्रे,शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध आहेत तसेच मराठी,हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य आहे.
कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन शामराव गाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन तुकाराम राठोड यांनी केले.
कार्यक्रमासाठी रामराव फड,नागसेन साळवे,आसाराम मुंडे, राजेभाऊ घुगे, श्रीराम घुगे,सुरेखा घुगे, मंदाकिनी घुगे, सुमन गिरी, रुक्मीन काळे हे उपस्थित होते.