“हिंद की चादर”” शाहिद समागम कार्यक्रमाच्या मराठवाडा स्थायी समितीवर विकास जाधव यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड

“हिंद की चादर” शाहिद समागम कार्यक्रमाच्या मराठवाडा स्थानीय समितीवर विकास जाधव यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड
जिंतूर- – “हिंद-की-चादर”
शीख समाजाचे धर्मगुरू श्रीगुरु तेग बहादुरसिंग साहिंबजी याांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी
वर्षा निमित्त देशाचे पंतप्रधान माननीय.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम पार पडणार असल्याने मराठवाडा क्षेत्रीय आयोजन समिती गठित करण्यात आली त्या मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून विकास जाधव अंबरवाडीकर यांची निवड करण्यात आली.
शीख धर्माचे ९ वे गुरू श्री. तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमच्या निमित्ताने चालू वर्षात नांदेड
या ठिकाणी पार पडणाऱ्या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ही समिती कार्यरत असणार आहे. गेल्या अनेक वर्षातील समाज कार्याच्या आधारावर ही निवड महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विभाग तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब,परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ.मेघनादीदी बोर्डीकर,मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख.श्री. रामेश्वरजी नाईक यांनी केली असल्याने अंबरवाडीकर यांचे अभिनंदन समाजातून होत आहे.या निवडीबद्दल विकास जाधव यांनी समितीचे जाहीर आभार व्यक्त केले आहे.




