मा.आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत:: व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांची 73 हजारांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

मा.आ. रामप्रसाद बोर्डीकरांच्या आवाहनाला प्रतिसाद::रमेश दरगड यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 73000 रु.मदत
जिंतूर –माजी आ रामप्रसाद जी कदम बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मा. आ.रामप्रसाद बोर्डीकर साहेबाच्या 73 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 73 हजार रु धनादेश दिला.
या बद्दल पालकमंत्री ना.मेघना बोर्डीकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांचा 24 ऑक्टोबर रोजी 73 वा वाढदिवस असून दरवर्षी माजी आमदारांचा वाढदिवस आनंदात साजरा केला जातो.परंतु या वर्षी राज्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट झाले असून महापुरा मुळे अनेक गावात,वसाहती, वाडी,वस्ती,तांडे मध्ये पाणी शिरून घरातील संसार उपयोगी वस्तू,अन्नधान्य,
कपडे सर्व काही वाहून गेले.अनेक ठिकाणी जनावरे,माणसे वाहून गेल्याने जीवितहानी सुद्धा झाली त्यामुळे या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त नागरिक,कार्यकर्ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी,फुलांचे हार,भेटवस्तू न आणता किंवा शुभेच्छा बॅनर न लावता त्या पैशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी असे आवाहन माजी आ बोर्डीकर यांनी केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी 73000 रु धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला.
या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद थिटे पाटील,प्रभाकर वाघिकर,नागेश तडकसे,सुनील भोंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मुख्यमंत्री सहायता मदत निधीच्या उपक्रमाचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




