विळा भोपळ्याच्या युद्धाकडे दुर्लक्ष करून राजेश वट्टमवारला साथ द्या::माजी मंत्री अर्जुन खोतकर

अध्यक्ष पदाचे उमेदवार राजेश वट्टमवार यांच्या जाहीर सभेस उस्फुर्त प्रतिसाद
माजी मंत्री अर्जुन खोतकर, आनंद भरोसे यांची उपस्थिती
हाकेला हाक देणारी शिंदे यांची खरी शिवसेना—- राजेश वट्टमवार
विळा भोपळ्याच्या लढाईकडे दुर्लक्ष करा आपल्यातील माणूस निवडा -माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर
जिंतूर—जिंतूर नगर परिषदेचा प्रचारअंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला असून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सह शिंदे गटाचे नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार राजेश वट्टमवार यांनीही प्रचारात मुसंडी मारलेली दिसून येत आहे.
आज जिंतूर येथे झालेल्या प्रचार सभेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटताना दिसून आला. भाजप अजित पवार राष्ट्रवादी गट व काँग्रेसच्या प्रचारासह शिंदे गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजेश वट्टमवार यांनीही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसून येत आहे. राजेश वट्टमवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हापासून शहरातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी भेटीवर जोर दिला असून त्यांना मतदारांचा प्रतिसाद भेटताना दिसत आहे.
मंचावरून राजेश वट्टमवार यांच्या प्रचारार्थ आनंद भरोसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार हा एक जरी असला तरी दोघांना भारी आहे अशी उपमा दिली. शिंदे यांच्या शिवसेनेला साथ द्या आम्ही तुम्हाला सर्वतोपरी चौफेर विकास देऊ असे आनंद भरोसे यांनी स्पष्ट केले.
तर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपल्या भाषणातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यातला माणूस वाटतात. राज्यातील शेतकरी असो किंवा लाडकी बहीण असो या सर्वांच्या मनात घर केलेले आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत.
ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असलेली गत पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 288 पैकी शिवसेनेने 80 जागा लढल्या व तब्बल 60 जागेवर दणदणीत विजय मिळवा. असे सांगून आम्ही दिलेला राजेश वट्टमवार हा आपल्यातील माणूस आहे या जिंतूर शहरात चाललेल्या परंपरागत विळा भोपळ्याच्या युद्धाकडे दुर्लक्ष करून आपल्यातला माणूस निवडा असे आव्हान माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नगराध्यक्ष पदाचे शिंदे गटाचे उमेदवार राजेश वट्टमवार यांच्या बद्दल केले.
राजेश वट्टमवार यांच्या भाषणातून त्यांना असलेली शहरातील जाण हे लक्षात येते त्यांनी जे जे शहरातील प्रश्न मांडले त्याचा पाठपुरावा आम्ही करू असा शब्द देतो असेही स्पष्ट केले. राज्यात लाडके बहिण योजना ही एकनाथ शिंदे यांनी आणली ही सत्यता महाराष्ट्रातील लाडकी बहीण जाणते याचे श्रेय अन्य राजकीय पक्ष लाटण्याचा प्रयत्न करतात हे केविलवाणी आहे. अशी मिश्किल टीका अर्जुन खोतकर यांनी केली.
तर अध्यक्षपदाचे उमेदवार राजेश वट्टमवार यांनी आपल्या भाषणातून प्रतिस्पर्धी राजकर्त्यावर टीका करत भविष्यात नगर परिषदेच्या माध्यमातून आपण शहरातील प्रलंबित खुंटलेला विकास करणार असल्याचे सांगून विकास कामाचे विजन उपस्थित जनसमुद्यापुढे मांडले त्यात त्यांनी विशेषतः येलदरी धरणातून पाणीपुरवठा शहराला केला जातो पण जवळच असलेल्या व पाण्याअभावी विकास पासून दुरावलेल्या औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केल्यास उद्योगास भरभराटी भेटेल असे भाषणात त्यांनी भाषणात सांगितले.
संपन्न झालेल्या या जाहीर सभेस नागरिकांचा प्रतिसाद भेटताना दिसून आला मंचावर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आनंद भरोसे यांच्यासह पंडित विटेकर,अध्यक्ष सखुबाई लटपटे, गिताबाई सूर्यवंशी, मदन लांडगे,सचिन पाटील,सविताताई, प्रल्हाद घोंगे, अक्षदाताई पाटील,दुर्गा देशमुख आदींची उपस्थिती होती.
एकूणच भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेस व शिंदे गटाचे राजेश वट्टमवार यांनीही अध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने एकूणच रंगत व उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे. एकूणच शहरातून सभेला चांगला प्रतिसाद दिसून आला.


