सुरेश नागरे यांचे कट्टर समर्थक पठाण वसीम खान प्रभाग 4चे प्रबळ दावेदार

सुरेश नागरे यांचे कट्टर समर्थक पठाण वसीम खान मजीद खान प्रभाग 4 चे प्रबळ दावेदार
@निवडणुकी पुर्वीच वसीम खान यांना वाढता पाठिंबा
जिंतूर:: सध्या दिवाळीची आतिषबादी संपल्यानंतर लागलीच जिंतूर:सेलू मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडघम वाजणार आहेत.
ही येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेची निवडणूक पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रतिष्ठेची व माजी आमदार विजय भांबळे व युवा नेते सुरेश नागरे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक राहणार आहे.
भाजपच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर जिंतूर ची नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी पूर्ण ताकतीने आखाड्यात उतरणारा असून यांचे प्रतिस्पर्धी व अजित पवार गटाचे दोन गट एकत्र झालेले माजी आमदार विजय भांबळे व सुरेश नागरे एकत्र येऊन भाजपला कशी टक्कर देतात हा येणारा काळच सांगेल.
यापूर्वी जिंतूरच्या नगरपालिकेवर माजी आमदार विजय भांबळे यांचे मजबूत प्राबल्य राहिले असून या वेळी पालकमंत्री व मुरब्बी राजकारणी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आपल्या ताब्यात नगर पालिका ठेवण्यासाठी पूर्ण ताकद लावणार यात दुमत नाही.
सध्या शहरातील प्रभाग चार साठी माजी नगर सेवक माजीद खान साहेब व आई दिवंगत पठाण तसलिम बेगम माजीद खान साहेब यांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र पठाण वसीम खान मजीद खान पठाण हे सुरेश नागरे यांचे समर्थक खंदे व एकनिष्ठ युवा कार्यकृत्ये म्हणून ओळख असलेले निवडणूक आखाड्यात मोठ्या ताकदीने उतरणार असून त्यांनी पुर्व तयारी म्हणून डोर टू डोर नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी झटत आहेत.
या पुर्वी माजी नगरसेवक व पालिकेत सभापती पद भूषविलेले मजीद भाई यांच्या कार्याची कारकिर्द उत्तम राहिलेली आहे.तत्कालीन नगराध्यक्ष सखाराम चिद्रवार,वसंत शिंदे सचिन गोरे,यांच्या काळात मजीद भाई व त्यांच्या दिवंगत पत्नी यांनी पालिकेत सभापती विराजमान असताना शहरासह प्रभाग चार साठी विकास कामाना व नागरिकांच्या विविध समस्या साठी नेहमी पुढाकार घेतला असल्याची माहिती आजपण नागरिक चर्चा करतात.
प्रभाग चार साठी इच्छुक उमेदवार वसीम खान सांगतात की त्यांच्या दिवंगत आईने 2011 च्या निवडणुकीत विजय अक्षरशा खेचून आणला होता त्याकाळी वाच पण आमच्या सोबत प्रभाग चार मधील जनता ताकतीने उभी आहे कारण आम्ही केलेले विकास काम मला सांगताना अभिमान वाटतो की पठाण मोहल्ला रस्ता दोन वेळा व तसेच 2008/2009 च्या काळात फूकरा मोहल्ला रस्ता रस्त्याचे दर्जेदार कामे,हजरत बखारी रहेमतूउला दर्ग्याचे काम, कुंभार गल्ली फुकरा मोहल्ला डबल पाण्याची पाईपलाईन, 2001 कब्रस्तान कंपाउंड वॉलची मंजुरी आदी विविध विकास कामाची शिदोरी माझ्या सोबत असून कामा सह वॉर्डातील प्रत्येक गरजू लोकांसाठी सुखदुःखात सहभाग नोंदविणे, आदी विकास कामे व लोकांच्या विविध प्रश्ना साठी रात्रदिवस झटलेले माजी नगरसेवक तथा सभापती मजीद भाई यांचा राजकीय व सामाजिक वारसा जपत यांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये निवडणूक लढवण्यासाठी माझा विजय हा निश्चित आहे.असा ठाम विश्वास प्रभाग चारचे इच्छुक उमेदवार वसीम खान मजीद खान यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळी फटाक्याच्या आतिषबाजी नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी नंतर लगेच नगरपालिकेचे पडघम वाजतील असे चित्र आहे




