Uncategorized

शेख इस्माईल सलीम पहेलवान काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

राष्ट्रीय काँग्रेस कडून मा.नगरसेवक शेख इस्माईल पहेलवान घोषित

जिंतूर –भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा जाहीर झाल्यानंतर दि. सात नोव्हेंबर रोजी माजी आमदार व काँग्रेस जिल्हा राष्ट्रीय ग्रामीणचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी माजी नगरसेवक शेख इस्माईल शेख सलीम पहेलवान यांची नगराध्यक्ष पदासाठी घोषणा केली.
भाजप तर्फे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे माजी आमदार विजय भांबळे यांनी सबिया बेगम फारोखी यांच्या नावाची नगराध्यक्ष पदासाठी घोषणा केली.

या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घोषणेनंतर 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबा जानी दुर्राणी यांनी जिंतूर नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली.
एकूणच आगामी होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी ही तिरंगी लढत होताना दिसून येत आहे.

संपन्न झालेल्या कार्यक्रमास बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेस पार्टी तर्फे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी फंक्शन हॉलमध्ये जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
उमेदवारीची घोषणा करतात बाबाजानी यांनी असेही सांगितले की लवकरच अन्य नगरसेवकांची सुद्धा घोषणा केली जाईल.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख इस्माईल पैलवान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की जिंतूर नगर परिषदेच्या आजी-माजी सत्ताधाऱ्याकडून व्हावा तेवढा विकास शहराचा झाला नाही आमच्या हाती सत्ता येतात आम्ही जिंतूर शहराचा चेहरा मोहरा बदलू विशेषता शहरातील प्रत्येक प्रभागात रस्ते,स्वच्छ पाणीपुरवठा व आज पावतो न झालेल्या विकास कामाकडे लक्ष देणार असल्याचे शेख सलीम पैलवान यांनी सुतोवाच केले आहे.

यामध्ये सुशिक्षित तरुणांसाठी भव्य लायब्ररी क्रीडा प्रेमी साठी क्रीडा संकुल प्रत्येक जाती धर्मासाठी मंगल कार्यालय सभागृह व कित्येक वर्षापासून उनिव असलेले सांस्कृतिक भवनाची पूर्तता केली जाईल असे शेख इस्माईल पैलवान यांनी स्पष्ट केले.

शेख इस्माईल यांनी असे सांगितले की काँग्रेसच्या पाठीशी आजही देशातील 65 टक्के जनता असून काँग्रेस हाच पक्ष देशातील एकोपा जपू शकतो व लोकशाही तत्त्वावर चालून धर्मनिरपेक्ष तत्वावर देश एक संघ ठेवू शकतो काँग्रेस पक्ष हा फुले,शाहू,आंबेडकर विचार धारेशी बांधलेला असून भविष्यात नक्कीच जिंतूर नगर परिषदेवर काँग्रेस विचारसरणीची सत्ता येईल असा ठाम आत्मविश्वास नगराध्यक्ष पदाची उमेदवार शेख इस्माईल यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात मुक्ती कलीम बेग मिर्झा यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना शेरोशायरीने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना सिराज यांनी केले यावेळी मंचावर बाबाजानी दुर्राणी यांच्या समवेत नागसेन भेरजे, ॲड.माधव दाभाडे,शेख सलीम पहेलवान व अन्य पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
एकूणच संपन्न झालेल्या या कार्यक्रमास जनसमुदाय व तरुणाई मोठ्या प्रमाणावर उपस्थित दिसली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!