हर्षवर्धन रोकड़े MBBS मध्ये पहिल्या यादीत चमकला

जिंतूरचा हर्षवर्धन रोकडे
एमबीबीएसच्या पहिल्या यादीत चमकला
हर्षवर्धन ठरला रोकडे परिवारातील पहिला एमबीबीएस
पालकमंत्री मेघना बोर्डीकरानी केले कौतुक
जिंतूर —माजी नगर सेवक एडवोकेट गोपाळ रोकड़े यांचे सुपुत्र हर्षवर्धन रोकड़े याचा पहिल्याच यादीत कराडच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवण्यास यश भेटले आहे. MBBS प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच यादीत प्रवेश मिळाल्याबद्दल रोकडे कुटुंबातील पहिलाच एमबीबीएस डॉक्टर होत असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर,माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गंगाधरराव बोर्डीकर,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र थिटे शिवाजीराव कावरखे (कृषी अधिकारी लोणार) माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख,सचिन गोरे,डॉ.पंडित दराडे,गोविंद थिटे (तालुका अध्यक्ष भाजप) तसेच एडवोकेट सुनील मते,खेत्रे आबा आदींनी हर्षवर्धन रोकडे याचे अभिनंदन केले आहे.