बोरीच्या भव्य तिरंगा रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले

बोरीच्या तिरंगा रॅलीने लक्ष वेधले
जिंतूर—, भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बोरी शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली आयोजन करण्यात आले होते.
या तिरंगी रॅली मध्ये शहरातील सर्व देशभक्त व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवित “विजयी विश्व तिरंगा प्यारा” झेंडा उंचा रहे हमारा” च्या घोषणांनी बोरी शहर दणाणून सोडले.
आज दिनांक 14 ऑगस्ट गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभर राबविण्यात येणाऱ्या तिरंगा अभियानाचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टी बोरी मंडळ यांच्या पुढाकारातून बोरी मार्केट कमिटी येथून कौसडी फाटा परिसरातून “भारत माता की जय” च्या घोषणा देत चिमुकल्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
हातात तिरंगा ध्वज घेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांनी चौका- चौकातुन वातावरण भारावून गेल्याचे दिसून आले.
या “हर घर तिरंगा” रॅलीमध्ये बोरी येथील शाळेंनेही सहभाग नोंदवला होता.
यामध्ये शकुंतलाबाई कदम बोर्डीकर शाळा,महाविद्यालय,केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा,जिल्हा परिषद हायस्कूल,जिल्हा परिषद प्रा.शाळा आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेतलेले सर्वांना आकर्षण ठरले.
रॅलीमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” च्या गगनभेदी देशभक्तीपर घोषणानी परिसर दणाणून सोडला. सर्व परिसरातून नागरिकांच्या वतीने या तिरंगा रॅलीचे स्वागत करण्यात आले.