विहिरीत विवाहितेचा चिमुकल्यासह संशयास्पद मृत्यू

माणकेश्वर शिवारात विवाहितेचा चिमुकल्यासह विहिरीत मृत्यू
रक्षाबंधनासाठी बामणीला येत असताना संशयास्पद घटना
जिंतूर ते माणकेश्वर मार्गावरील धक्कादायक घटना
जिंतूर—पोलीस ठाणे जिंतूर हद्दीतील माणकेश्वर येथील शेतातील विहिरीत अनोळखी स्त्री व दीड वर्षाच्या बालकांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ.
बामणी येथील गोविंदराव जिजाराव जाधव यांची मुलगी शारदा हिचा विवाह जांभोरा ता.सिंदखेडराजा जि.बुलढाणा येथील भारत देशमुख यांच्यासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता शारदा भारत देशमुख (वय 27)हिला तीन वर्षाचा आदर्श नावाचा मुलगा होता. दि.10 ऑगस्ट रोजी बामणी येथे अशोक गोविंदराव जाधव या भावाकडे रक्षाबंधन निमित्त नवऱ्यासोबत येत असताना येलदरी नजीक माणकेश्वर पर्यंत मयत शारदा देशमुख मुलासह आली होती. बामणी ला येण्यासाठी बस बदलून यावे लागते म्हणून माणकेश्वर ला पती व मुलासह बसची वाट पाहत थांबली असल्याचे प्रत्यक्ष दर्शनीनी सांगितले आहे. बस येण्यास उशीर होत असल्याकारणाने माणकेश्वर येथील महादेव मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी गेले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र विहिरीत आज दि.13 ऑगस्ट रोजी शारदा व तिचा मुलगा आदर्श हे अशोक काकडे या शेतकऱ्याच्या विहिरीत तरंगत असताना दिसून आले आहेत. बामणी येथील गावकरी मंडळी ही लेक आपलीच असावी म्हणून पहावयास गेले आणि तिची ओळख पटली जिंतूर येथील पोलीस स्टेशनला बामणी येथील दीपक देशमुख यांनी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यावरून जिंतूर पोलिसांचे पथक एपीआय पुंड ,जमादार दत्तात्रेय गुगाणे ,यशवंत वाघमारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. व दोन्ही मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले व जागेवरच डॉक्टरांच्या मदतीने पोस्टमार्टम करण्यात आले आहे.अद्याप जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अंत्यसंस्कारानंतर गुन्हा नोंद करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.