गणेश काकडे यांचाही भाजपच जाहीर प्रवेश!!!

गणेश काकडेचाही भाजप मध्ये प्रवेश
भाजप मध्ये इन्कमिंग जोमात
जिंतूर- आंबेडकरी चळवळीतील सक्रिय राहणारे जिंतूर तालुक्यातील युवा नेतृत्व गणेश गुलाबराव काकडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री ना. मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला.
ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, अविनाश भाऊ काळे ,भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद मामा थिटे, नानासाहेब राऊत, राजेंद्रजी नागरे,यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप मध्ये प्रवेश घेतला.
पक्षकार्याला बळकटी देऊ,हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नामदार
सौ मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या कार्यपद्धीला व विचारणांना प्रभावी होऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून समाजकार्याच्या विकासाचा हा प्रवास आता नव्या उर्जेनं, नव्या संघटनशक्तीच्या साथीनं सुरू होईल अशीही त्यांनी प्रवेशा दरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या.
एकूणच दिवाळीनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपमध्ये अन्य पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश घेत असल्याने सध्या निवडणुकीपुढे भाजपमध्ये इन्कमिंग जोमात सुरू असल्याने एकूणच भाजपला बळकटी भेटताना दिसून येत आहे.


