भाजप अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष पदी माबुद कुरेशी

भाजप अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी माबुद कुरेशी यांची निवड
जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे) भाजप अल्पसंख्यांक शहर अध्यक्षपदी शेख माबुद शेख हुसनोद्दीन कुरेशी यांची अल्पसंख्याक मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीचे नियुक्ती पत्र पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.भाजप शहर मंडळ अध्यक्ष विलास भंडारे यांनी त्यांची निवड केल्याची घोषणा केली.
माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांचे गत 20 वर्षांपासून एक निष्ठ खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख असून उच्च शिक्षित व सर्व जातीधर्माच्या लोकांशी त्यांची जवळीकता आहे.सामाजिक उपक्रमात त्यांचा पुढाकार दिसून येतो.
त्यांनी या पूर्वी जिंतूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा लढविली असून शहरातून सर्व जातीधर्मातुन त्यांना पसंती भेटल्याचे सिद्ध झाले होते.त्यांच्या कडे विविध धर्माच्या तरुणाईची फळी असून ते एक शिक्षण संस्था सुद्धा सांभाळतात.मा. आ.रामप्रसाद बोर्डीकर,पालकमंत्री मेघना बोर्डीकर,मार्केट कमेटी सभापती गंगाधर बोर्डीकर आदींच्या मार्गदर्शनात त्यांची भाजप अल्पसंख्याक शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याने सबंध समाज बाधवात समाधान व्यक्त होत आहे.
या नियुक्ती दरम्यान पालकमंत्री मेघना बोर्डीकर,माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे,विलास भंडारे, अशोक बुधवंत,लखन जाधव,आदींची उपस्थिती होती.
चौकट
बोर्डीकर परिवारांनी व भाजप पक्षाने जो विश्वास टाकून माझ्या वर जी जवाबदारी टाकलेली आहे.त्या जवाबदारीस कुठेही तडा जाऊ न देता टाकलेला विश्वास सार्थ ठरवील व भाजप पक्ष्याची ध्येयधोरणे व विकास कामे तळागाळातील शेवटच्या घटका पर्यत पोहचविणे,माहिती देणे, अल्पसंख्याक समाजबद्दलची सकारात्मक भूमिका प्रत्येक घटका पर्यत पोहचविण्याचे काम अहोरात्र करेल असे माबुद कुरेशी यांनी स्पष्ट केले.