Uncategorized

अपघात हा योगायोग नसून निष्काळजीपणाचा परिणाम:: पो.उ. सरनाईक

अपघात हा योगायोग नसून निष्काळजी पणाचा परिणाम :: पो.उ. सरनाईक
जिंतूर:::अपघात हा योगायोग नसून निष्काळजी पणाचा परिणाम असल्याचे मत महामार्ग पोलीस उपनिरीक्षक गणेश सरनाईक यांनी व्यक्त केले.ते जिंतूर आगारात आयोजित रस्ते सुरक्षितता अभियान कार्यक्रमा अंतर्गत बोलत होते.
त्यांनी या विषयावर बोलतांना असेही सागितले की अपघाताची भीषण वास्तवता भयावह आहे.
दरवर्षी भारतात लाखो लोक अपघातात मृत्युमुखी पडतात,
त्यापैकी बहुसंख्य तरुण आणि कुटुंबातील कमावते सदस्य असतात.
यामुळे एक अपघात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करतो.अपघाताची प्रमुख कारणे वेगमर्यादेचे उल्लंघन
हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणे
मोबाईलवर बोलत वाहन चालवणे दारू पिऊन वाहन चालवणे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष नियम मोडणे ही शौर्यगाथा नाही तर मृत्यूकडे नेणारी वाट आहे.
त्यांनीही असेही सागितले की
सुरक्षेचे सोपे नियम म्हणजे दुचाकीवर नेहमी हेल्मेट वापरा चारचाकीमध्ये सीट बेल्ट बांधा वेगमर्यादा पाळा,वाहन चालवताना मोबाईल बाजूला ठेवा,सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंगचा सन्मान करा या छोट्या सवयी मोठे जीव वाचवतात.प्रत्येकाची जबाबदारी रस्ता सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही,ती आपली,माझी आणि आपल्या प्रत्येकाची आहे.आपण सुरक्षित राहिलो, तरच आपले कुटुंब सुरक्षित राहील.

तरुणाईला संदेश देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांनी रस्ता सुरक्षा ही आपली जीवनशैली बनवावी.आज शिस्त पाळली तर उद्या आयुष्य फुलते. असा मोलाचा संदेश महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सरनाईक यानी दिला.व आजपासून एक संकल्प करूया असे सांगत पुढ़ील प्रमाने संदेश दिला
“नियम पाळू — जीव वाचवू,
अपघात टाळू — भारत घडवू.”
आपला एक निर्णय
कुणाच्यातरी आयुष्याचा संपूर्ण भविष्य बदलू शकतो. असे रस्ते सुरक्षितता कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केले.
आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनीही देशात दर मिनिटाला एक अपघात होतो. सुदैवाने अवध्य वाहतुकीच्या तुलनेत एसटी महामंडळात अपघायाचे प्रमाण नगण्य आहे.सध्या महामंडळातर्फे एक जानेवारी ते एसटी जानेवारी दरम्यान सुरक्षितता अभियान राबवले जात असून हाच महिना नाही तर चालक बांधवांनी वर्षाचे पूर्ण 365 दिवस सुरक्षित वाहने चालवावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमास उपस्थित ब्रम्ह कुमारीच्या सुमनताई यांनीही उपस्थित चालकांना विविध व्यसनापासून दूर राहावे असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमास हजार प्रमुख आनंद चव्हाण महामार्ग पोलीस उपनिरीक्षक गणेश सरनाईक, स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे, वाहतूक निरीक्षक शरद सोनवणे, वाहन परीक्षक संजीव भांबळे, एच.एम.सुनील पंडित,प्रल्हाद मुंढे,सुमनताई, प्रवासी संघटनेचे सचिन रायपत्रेवार,सिराज सिद्दिकी,खूशाल घुगे या सह चालक वाहक यांत्रिक कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गुणीरत्न वाकोडे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!