Uncategorized

शहराच्या उलट्या नदीचे होणार संवर्धन-पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची माहिती

मुख्याधिकारी नेमिनाथ दंडवतेस प्रस्ताव सादर करण्याचा सूचना

शहराच्या उलट्या नदीचे होणार संवर्धन—पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची माहिती

@ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)-पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या संकल्पनेतुन शहरातून वाहणाऱ्या उलट्या नदीचे लवकर संवर्धन केले जाणार होणार आहे.
या निर्णयामुळे उलट्या नदीला नक्कीच अच्छे दिन येणार असल्याचे शहरवाशियात समाधान व्यक्त होत आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की जिंतूर शहर हद्दीतून उलटी नदी शहरातील विविध भागातील सांडपाणी या नदीत सोडले जात असल्याने सहाजिकच पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी व नदीकाठील धूप थांबवण्या संदर्भात या उलट्या नदीचे संवर्धन करणे काळाची गरज निर्माण झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढे हीच उलटी नदी बोरी,चांदज जवळील करपरा नदीस मिळते. नदी काठ विकसित करण्या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेमिनाथ दंडवते यांना नदी संवर्धन योजनेअंतर्गत शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्ट केले आहे.या अंतर्गत पुढील कार्यवाही करण्या बाबत प्रस्तावित केले आहे.शहरातील घाट विकसित करणे,नदी काठची धूप रोखणे व नदी संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना कार्यान्वित करणे.
या अनुषंगाने शासन निर्णय 1 मार्च 2014 च्या मार्गदर्शक तत्वानुसार या सह सुसाध्यता अहवालानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल या क्षेत्रातील मान्यताप्राप्त तंत्र तांत्रिक संस्थे मार्फत किंवा सल्लागाराच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे.योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुसाधता अहवाल तयार करून तो शासनास तत्त्वता मान्यतेसाठी पाठविल्या नंतर अहवालाच्या तांत्रिक छाननी अंती सचिव स्तरिय समिती द्वारे योजनेत समाविष्ट करायची आहे.व उपयोगात आणल्याचे तंत्रज्ञान याची निश्चिती झाल्या नंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था मान्य कामाचा सविस्तर अहवाल नदी कृती योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वा प्रमाणे तयार करेल किंवा योजने अंतर्गत स्थापित तांत्रिक कक्षा कडून तयार करून येईल सविस्तर प्रकल्प अहवालाचे प्राधिकरण संस्थेचे तांत्रिक मूल्याकन करून त्या प्रमाण पत्रासह अहवाल शासनास अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात

येईल.
वरील प्रमाणे शहरातील उलट्या नदीच्या संवर्धनासाठी सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्या करिता तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती जिंतूर नगर परिषदे तर्फे करण्यात आली आहे.
पुढे शासनाकडे निधी अहवाल प्रस्ताव पाठवून मंजूर निधीतून उलट्या नदीचा कायापालट करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!