“त्या”शिक्षकाची बदली रद्द करा–सरपंचासह ग्रामस्थांची मागणी

“त्या” शिक्षकाची बदली रद्द करा
सरपंचा सह ग्रामस्थांची मागणी
जिंतूर— सरपंचासह ग्रामस्थांनी शिक्षकाची प्रतिनिधी रद्द करण्याची मागणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील सावळी भाऊ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक पीडी दिसेल यांची प्रतिनियुक्ती खोलगाडगा येथील शाळेत करण्यात आली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे सरपंच, ग्रामस्थ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिंतूर गट शिक्षण अधिकारी केली आहे.
निवेदनात नमूद केले की सावळी (बु) येथे पहिली ते सातवी पर्यत शाळा होती.परंतु शिक्षकांच्या कमतरतेमुळे पाचवी ते सातवीचे वर्ग बंद पडले असून सद्यस्थिती पहिली ते चौथ्या वर्गा पर्यतच्या शाळेत 131 विद्यार्थी विद्यार्जन करत आहेत.चौथ्या वर्गाची एक वेगळी तुकडी आहे.पी.डी. बिसेन हे दुसरी वर्गाला शिकवत असून या वर्गात 31 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या वर्षी गावकरी,शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या मेहनती मुळे एका इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला आहे.
सह शिक्षक पी.डी. बिसेन यांची प्रतिनियुक्ती खोलगाडगा येथील जिल्हा परिषद शाळेत या उर्वी 18 जून रोजी करण्यात आलेली आहे.ती प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करावी अशी माफक मागणी करण्यात आलेली आहे.