एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण न झाल्यास धरणे आंदोलन व चक्काजाम होणार:: कृती समिती आक्रमक

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध आर्थिक मागण्यासाठी 13 ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन
जिंतूर ——राज्यभर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक वन्य मागण्यासंबंधी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कृती समितीकडून येत्या 13 ऑक्टोबर पासून प्रत्येक आगारापुढे बेमुदत मुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने आज जिंतूर शाखा कृती समितीतर्फे आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांना त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असून या मागण्याकडे प्रत्येक शासन हेतू पुरस्कर दुर्लक्ष करण्याचा आरोप कर्मचाऱ्यातून करण्यात आला असून पूर्ण आर्थिक मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन व याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास राज्यभर धरणे आंदोलन या पुढे एसटीचा चक्काजाम आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे.
कामगाराचे महागाई भत्ता घरभाडे भत्ता 2018 पासून आर्थिक देणे थकलेले असून तसेच आग्रिम दिवाळी उचल,समाधानकारक बोनस अशा मागण्या उचलून धरण्यात आलेले आहे.
निवेदन देते वेळी जिंतूर कृती समितीतील श्रीनिवास देशमुख,अनिल घुगे,तथागत कांबळे, राजू चव्हाण,नागोराव मोरे, ठाकरे,सोनुले, दिलीप घुगे,अहमद पठाण,शिवाजी जाधव,मदन मुंडे,प्रभाकर सातपुते, सय्यद हाजी भाई, मधुकर जाधव, सतीश भुजबळ आदींची उपस्थिती होती.




