Uncategorized

कर्कश धूम स्टाईल बुलेट धारकांना आवरा

अज्ञान ट्रिपल धारक दुचाकींस्वार सुसाट:पोलिसांचे दुर्लक्ष

रकर्कश बुलेटधारकांना आवरा

धुमस्टाईल अज्ञान ट्रिपलसीट दुचाकिंचा धुमाकूळ

पोलीस प्रशासन लक्ष देईल का???

अवैधरीत्या गौण खनिज वाहक ट्रॅक्टरही सुसाट

जिंतूर-( गुणीरत्न वाकोडे)-सध्या शहरात धुमस्टाईल दुचाकी धारकांचा धुमाकूळ सुरू असून या कडे पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत असल्याचे सिद्ध होत आहे.परिणामी नागरिकांत संताव व्यक्त होताना दिसत आहे.
या मध्ये एका दुचाकीवर अज्ञान ट्रिपल सीट बसवून शहरातून वेगाने वाहने पळवीत असून यावर स्थानिक पोलीस प्रशासन असेल वेगाने शहरातून बेशिस्त ट्रिपल धारकावर घरच्या पालकांचे सुद्धा लक्ष राहिलेले नाही.याच कारणाने अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढलेले दिसत आहे.या कुठेही कायद्याचा धाक तसेच घरच्यांचा अंकुश राहिलेला दिसून येत नाही.
तसेच सध्या काही बुलेट धारक मर्यादे पेक्षा जास्त धुमस्टाईल आपली बुलेट पळवत असून वेगाने वाहन पळताना कर्कश फटाके फोडत सुसाट पळत आहे.या कर्कश आवजाने आजारी व वयस्क व्यक्तींना नाहक त्रास करावा लागत आहे.
विशेष बाब म्हणजे काही स्कुटी व दुचाकी वाहनावर 12 ते 13 वर्ष वय असणारे अज्ञान मुले ट्रिपल सीट वाहने बिनदिक्कत पोलिसांच्या नाकावर टिचून वाहने शहरातून रहदारीच्या मार्गावरुन सुसाट वाहने पळवत आहे.त्यांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला दिसून येत नाही.
शहरात कुठेही नो पार्किंग झोन बाबत नियम पाळले जात नाही.शहरात येलदरी मार्ग,व तहसील मार्ग सोडता शहरातून जाणारा रस्ता अरुंद स्वरूपाचा असून येथे अश्या बेशिस्त वाहन धारकांच्या धूमस्टाईल वाहन चालवल्या मुळे व्यवस्क व लहान बालकांचे जीव धोक्यात आलेले आहे.
पोलीस प्रशासनाने अश्या वाहन धारकावर कायद्याची जबर जरब बसवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे.
या दुचाकी वाहना सह आटो चालक अवैध वाहतूक बेशिस्तपणे वाहने चालवीत आहे.
कोणत्याही नियमांचे ते अनुपालन करत नाही.ग्रामीण भागा सह शहरातून अवैध गौण खनिजांचे उतखनन,नेमगिरी,ईदगाह, नेमगिरी व ईटोली आदी ठिकाणाहून होत असून सदरील ट्रकटर धारक अरेरावी करत बेशिस्तपणे आपली वाहने शहरातून पळवीत असून या कडे पोलीस प्रशासना महसूल प्रशासन डोळेझाक करत आहे.
या मोठा प्रमानावर मालवाहतूक होत असलेल्या अवैध गौण खनिजामुळे प्रशासनाचा मोठ्या प्रमानावर ( महसूल) रॉयल्टीचे नुकसान होत आहे
चौकट
शहरातील बस स्थानकात सुद्धा आटो,अन्य वाहने दुचाकी धारक बिनदिक्कत प्रवेश करत असल्याने एसटीच्या चालकांना एसटी डेपोत आता आणताना व बाहेर पडताना कमालीची कसरत करावी लागत आहे.
या कडेही एसटी स्थानकात नियुक्त गृह रक्षक दल किंवा पोलीसानी नियमावली बसवावी असे वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button