समता सैनिक दलास कपडा भेट:भरीव कार्याची घेतली दखल

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)— तालुक्यातील समता सैनिक दलाचे भरीव कार्य पाहता, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी व आद. भीमराव य. आंबेडकर यांनी केलेले आव्हान-गाव तिथं शाखा व एक घर एक सैनिक या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी बामणी, ता. जिंतूर येथील कट्टर आंबेडकरवादी व धम्मप्रेमी बौद्ध उपासक आयु. पांडुरंग गोविंदराव वाकळे यांनी दिनांक १-४-२०२५ रोजी जिंतूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे समता सैनिक दलासाठी १० ड्रेस चा कपडा दान दिला.
त्याप्रसंगी समता सैनिक दलाचे मेजर जनरल आनंदा भेरजे,भा. बौ. महासभा तालुका अध्यक्ष आयु. मोहन घनसावत, वंचित चे जिल्हा सरचिटणीस आयु. शिवाजीराव वाकळे, समता सैनिक दलाचे ज्येष्ठ सैन िक कमांडर आयु. महेंद्र बनसोड सर, नगर परिषद जिंतूर चे माजी नगरसेवक आयु. चंद्रकांत बहिरट व बंटी निकाळजे, बौद्धाचार्य विकास मोरे, सा. कार्यकर्ते भीमराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
दाते हे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव वाकळे यांचे काका असून त्यांच्या प्रयत्नातूनच हे दान प्राप्त झाले.