वरूड (नृ) गटात संधी दिल्यास निवडणुकीवर ठाम::सौ.मीनाताई केशवराव बुधवंत

वरूड (नृ) गटात संधी दिल्यास निवडणूक लढणार :: माजी जि.प.अध्यक्षा मीनाताई केशवराव बुधवंत
जि.प.निवडणूक ही भाजपच्या प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई
राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गढ भाजप भेदणार का
गत निवडणुकीत वरूड गटात सौ. संगीता थिटेस यांचा केला होता पराभव
जिंतूर:::राज्यातील महानगर पालिका निवडणुकीचे सूप वाजतात.कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद निवडणूक दोन टप्प्यात संपन्न होणार आहेत.पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदेच्या तर दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग हाताळणार आहेत.दुसऱ्या टप्प्यातील 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका मध्ये 50 टाक्या पेक्षा जास्त आरक्षण असल्याचा ठपका निवडणूक आयोगाने ठेवलेला आहे.निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.
राज्यात जरी महायुतीचे ट्रिपल इंजिन सरकार असले तरी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत भाजप,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिने प्रस्थापित राजकीय गट विरोधी पार्टी प्रमाणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत.
त्याच प्रमाणे संपन्न झालेल्या नगर पालिका निवडणुकी प्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत निवडणुका सुद्धा जिंतूर सेलू जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक भाजप व राष्ट्रवादी पार्टी ही एकमेका विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे चित्र आहे.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संपन्न झालेल्या नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. पण मागोवा घेतला असता बोर्डीकर परिवार काँग्रेसमध्ये असताना गत जिल्हा परिषद मध्ये जिंतूर सेलू या मतदारसंघात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस चिन्हावर निवडणूक लढवली असता बोर्डीकर कुटुंबास भोपळाही फोडता आला नव्हता.
पण आता चित्र काहीसे वेगळे आहे. बोर्डीकर कुटुंबाने भाजप प्रवेश घेतला असता सलग दोन वेळा आमदार व आता सध्या नामदार मेघना बोर्डीकर ह्या परभणी जिल्ह्याच्या भाजपच्या पालकमंत्री आहेत. विशेषता राष्ट्रवादीतून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत अविनाश काळे राजेंद्र नागरे, सेलू तालुक्यातील अशोक काकडे व बोर्डीकर गटाकडून उद्धव शिवसेना गटात गेलेले व पूर्वीचेच बोर्डीकर यांचे निष्ठावान प्रभाकर वाघीकर हि प्रस्थापीत मंडळी सोयीनुसार पुन्हा भाजपत आलेली असल्याने निश्चितच सोयीनुसार पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने कौल दिला तर भाजप सध्या तरी मजबुत स्थितीत दिसत आहे.
वरूड (नृ) गट राष्ट्रवादी गटाचा परंपरागत बालेकिल्ला या वेळी सुद्धा आपल्या ताब्यात ठेवतात का या बाबत उत्सुकता निश्चितच आहे.
गत नऊ वर्षां पूर्वी याच गटात सौ.मीनाताई बुधवंत यांनी तब्बल 5774 मते घेऊन बोर्डीकर यांचे निष्ठावान व खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले राजेंद्र थिटे यांच्या सुविद्य पत्नी सौ.संगीताताई राजेंद्र थिटे यांचा जवळपास 1035 मतांच्या फरकाने पराजय केला होता.सौ.संगीताताई राजेंद्र थिटे यांना 4749 मतापर्यंत मजल मारता आली होती. यावरून गटात शेवडी येनोली तांडा,साखरतळा,वडाळी,बलसा अकोली,मालेगाव पांगरी, पुंगळा, पुंगळा तांड, माथला, शेवडी, चांदज,नागापुर आदि गावांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत पांगरी या गावातून सुरेश नागरे यांना 236 मतांची आघाडी होती. सौ मीनाताई केशवराव बुधवंत या पांगरी गावच्या दोन वेळा सरपंच असून त्यांनी सर्वप्रथम 2005 मध्ये नऊ जागा निवडून आनल्या होत्या.यावेळी विरोधकांना खातेही उघडता आले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राजकारण नेहमी पांगरी गावच्या अवतीभवती निश्चितच फिरत आलेले आहे.सौ मीनाताई केशवराव बुधवंत यांचे सासरे अर्जुनराव बुधवंत एक राजकीय धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.त्याचा एक त्या काळी राजकीय वजनदार दबदबा होता.त्यांची गावच्या सत्तेच मजबूत पकड होती. ते तब्बल पांगरी गावचे पंधरा वर्ष सरपंच होते.त्यांच्या शिवाय गावचे राजकीय पान हलत नव्हते. दिवंगत अर्जुनराव बुधवंत जिंतूर ग्रुप सोसायटीचे चेअरमन, जिंतूर मार्केट कमिटीचे सभापती पद सुद्धा भूषविले होते.
याच आदर्श राजकीय वारसाचा पाया पुढे पांगरीच्या बुधवंत कुटुंबाने नियमित सुरू ठेवला.त्यांचे सुपुत्र प्रसादराव बुधवंत,केशवराव बुधवंत आजही जिंतूरच्या राजकारणात सक्रिय आहेत.
केशवराव बुधवंत हेही तत्कालीन कांग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनीही 2015 ते 2021 पर्यंत पांगरीचे उपसरपंच पद भूषविले,2010 ते 2015 सरपंच पद भूषविले,अनेक वेळी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून बहुमान मिळवला.
माजी आमदार विजय भांबळे यांच्या मार्गदर्शनात ओपन सर्कल वरूड (नृ) गटात जिल्हा परिषद सदस्य विजयी होऊन पांगरीस जिल्हा परिषद अध्यक्ष पद विजय भांबळे यांनी बहाल केले होते.
तालुक्यातील पांगरी गावाने परभणी जिल्हा परिषद पद मिळण्याचा मान सौ.मीनाताई बुधवंत यांनी मिळवत तत्कालीन पदावर असताना यांनी त्यांच्या कामात कुठेही भ्रष्टाचाराचे गालबोट न लावता. कामात पारदर्शता ठेवत आपला यशस्वी ठसा उमटविला.
पर्यावरण,शाळा स्वच्छता अभियान,माँ-बेटी मेळावे,मुलींचे वसतिगृह,अंगणवाडी उत्कृष बांधकाम,निर्मल ग्राम स्वच्छते अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सबंध परभणी जिल्हाभर यशस्वी राबविण्यास प्रोत्साहन दिले.
शौचालय,घरकुल,ग्रामीण भागातील शाळा बांधकाम,ग्रामस्वच्छता अभियान,दुर्लभ आजारांच्या रुग्नांना आर्थिक मदत भेटावी म्हणून शासनां कडे वेळेवेळी पाठपुराव्या सह लेक शिकवा अभियान,ग्रामीण रस्ते पांदन रस्ते,आदि प्रश्न सोडविने, विशेषता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रेनवर विशेष भर मिनाताई बुधवंत यानी कर्मचारी व अधिकारी यांच्यात समन्वता ठेवून दिला होता.
या वरुड सर्कल मधून मीनाताई केशवराव बुधवंत यांना उमेदवारी भेटल्यास त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्या कुटुंबातील भाजप कडून सौ.नमिताताई संतोष बुधवंत किंवा पुन्हा एक वेळ सौ.संगीताताई राजेंद्र थिटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून पुन्हा एक वेळ थेट लढतीचे चित्र भाजप विरुद्ध राष्ट्रवादी रणधुमाळी दिसणार हे दिसून येते.




