येलदरी (कॅम्प) च्या वसाहत व शासकीय निवासस्थानावरील अतिक्रम उठवण्याच्या कार्यवाहीस स्थगितीच्या मागणीस उपमुख्यमंत्री अजितदादांची तत्परता::फोनद्वारे स्थगितीच्या दिल्या सूचना

येलदरी (कॅम्प) येथील वसाहत व शासकीय निवासस्थानावरील अतिक्रमण उठवण्याच्या कार्यवाहीस स्थगितीच्या मागणीस उपमुख्यमंत्री अजितदादांची तत्परता
फोनद्वारे स्थगितीच्या दिल्या सूचना
जिंतूर :- ०९ जानेवारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री अजितदादा पवार साहेब परभणी दौऱ्यावर आले असता जिंतूर तालुक्यातील येलदरी (कॅम्प) येथील वसाहत व शासकीय निवासस्थानावरील अतिक्रमण उठवण्याच्या कार्यवाहीस स्थगितीची देण्यासाठी संबधितास आदेश करण्याची मा.ना.अजितदादा यांना जिंतूरचे
मा.आ.विजयराव भांबळे, आ,राजेश दादा विटेकर व श्री रामराव उबाळे यांनी एका लेखी पत्राद्वारे विनंती केली.
जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाअंतर्गत येलदरी (कॅम्प) येथील शासकीय जमिनीवर जलसंपदा विभागाचे शासकीय निवासस्थान व मोकळ्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधलेली आहेत. सदर शासकीय जमिनीवर अतिक्रमित 502 घरे असून त्यामध्ये गेली 60 वर्षापासून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या राहते. तसेच शासकीय निवासस्थानात अनेक शासकीय कर्मचारी व नागरिक वास्तव्यास आहेत.
सदर सर्व नागरिकांना अतिक्रमण हटवून जागा आठदिवसात रिक्त करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी जिंतूरचे मा.आ.विजयराव भांबळे यांनी सर्व नागरिकांचे अगोदर नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे त्यानंतर अतिक्रमण हटवण्यात सुरुवात करावी तो पर्यंत अतिक्रमण हटवण्याच्या कार्यवाहीस तात्काळ स्थगिती देण्यासाठी सहाय्यक अभियंता, परीरक्षण उपविभाग, येलदरी यांना आदेशित करणायत यावे, अशा आशयाचे लेखी पत्र देऊन विंनती करण्यात आली. त्यावेळी मा.अजितदादा यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत संबंधितास फोनद्वारे सूचना दिल्या.
यावेळी चे मा.आ.विजयराव भांबळे, आ,राजेश दादा विटेकर व श्री. रामराव उबाळे, बाळासाहेब घुगे, ऋषिकेश चव्हाण, मनोज खंदारे, माधवराव चव्हाण, ई.उपस्थित होते.




