Uncategorized

जिंतूर नगर परिषदेची प्रभाग 11 (क) ची निवडणूक रद्द

जिंतूर नगर परिषदेच्या प्रभाग 11(क) ची निवडणूक स्थगित

@स्थगिती मुळे बोर्डीकरांचे भासे भाजपचे उमेदवार सचिन गोरे व राष्ट्रवादीचे अरुण घुगे अडचणीत

@ निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णया पर्यंत मतदारात गोंधळात

जिंतूर–दिनांक 29 नोव्हेंबरचे राज्य निवडणूक आयोग यांचे न्यायालयीन अपील दाखल झालेले नगर परिषदा व नगर पंचायती मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम 2025 त्या अनुषंगाने जिंतूर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 11(क) मधील उमेदवारांनी निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते.
या अपिलाचा निर्णय मा. जिल्हा जिल्हा न्यायालयाने 24/11/2025 ला दिला. आणि उमेदवाराला तीन दिवसांपेक्षा कमी कालावधी असल्याने मा निवडणूक आयोगाने यामध्ये सुधारित कार्यक्रमकरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या मुळे फक्त जिंतूर नगर परिषदेच्या प्रभाग 11 मधील (क) निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे. व याचा निवडणूक कार्यक्रम पुढील सूचनेप्रमाणे कळविण्यातील येईल. उर्वरित सर्व प्रभागातील नगरसेवकांची व नगराध्यक्ष यांची निवडणूक ठरल्याप्रमाणे दोन डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत होईल. व निवडणुकीचा निकाल सकाळी 10 वा. सुरू होईल अशी माहिती जिंतूर निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सेलू शैलेश लाहोटी यांनी सांगितले आहे.
या रद्द झालेल्या प्रभाग 11 (क) निवडणुकीमुळे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे भासे भाजपचे उमेदवार सचिन गोरे व अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार अरुण घुगे अडचणीत आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!