मराठी भाषा ही आपल्या हृदयातील बोली भाषा–मयूर जोशी

मराठी भाषा ही आपल्या हृदयातील बोली भाषा —— मयूर जोशी
जिंतूर एसटी आगारात मराठी दिन साजरा
जिंतूर —आपली मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचा
हृदयातील बोली भाषा असल्याचे मत मयूर जोशी यानी व्यक्त केले.ते एसटी आगारात आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आयोजित 3 आकटोंबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी सप्ताहाच्या आयोजित पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
जोशी सरांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून मायबोली मराठी भाषेचे महत्व विषद केले.मराठी भाषेला नुकताच केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने आपल्या महाराष्ट्राचा व आपल्या मराठी भाषेचा सन्मानच झाला असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
मायबोली मराठी भाषेचे महत्व विषद करणाऱ्या गोड कविता पण त्यांनी सादर करून उपस्थितांचे त्यांनी मन जिंकले.
——————————————–
चौकट
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रमाई महिला विचार मंचच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या आशा संभाजी खिल्लारे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत मराठी भाषा तर टिकलीच पाहिजे व राज्यातील मराठी शाळा कशी टिकेल व पुढे जाईल या साठी जनचळवळ कशी उभारेल व त्या साठी जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा व जिल्हा परिषदेची शाळा जर टिकवायची असेल तर आपण सर्वांनी पुढाकर घ्यावा असे आवाहन आशा खिल्लारे यांनी व्यक्त केले.
——————————
या वेळी कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे सह प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्राहक मंचाचे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव शिंदे,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार सचिन
रायपत्रीवार,आशाताई खिल्लारे,वरिष्ठ लिपिक प्रल्हाद मुंढे,लिपिक गजानन घुगे,कल्याणराव देशमुख,लिपिक राहुल,डी.एस. गुव्हाडे,मधुकर जाधव सह चालक,वाहक प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन गजानन घुगे तर आभार इंधन लिपिक गुणीरत्न वाकोडे यांनी व्यक्त केले.




