Uncategorized

श्रद्धास्थान भोगाव (देवी) येथे सोई उपलब्ध करण्याची भक्तजनांची मागणी:: नियुक्त महिला पोलिस कर्मचाऱ्यांची हुल्लडबाजी भक्तासाठी ठरली त्रासदायक

भोगाव (देवी) देवस्थान भक्तां साठी गैरसोयीचे माहेरघर

मंदिरा भोवती अंथरलेली टोकदार
गीट्टी ठरते त्रासदायक

महिला पोलिस कर्मचाऱ्यांची भाविकासोबत हुल्लडबाजी

महिला पोलिस कर्मचाऱ्यास कर्तव्याचा विसर

  1. जिंतूर—दरवर्षी नवरात्र निमित्त तालुक्याच्या पंचकोशीत प्रसिद्ध असलेल्या भोगाव (देवी) येथे नऊ. दिवस भक्तमय वातावरण असते. शहरी भागासह ग्रामीण भागातील भक्त वर्ग दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.
    विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर येत असतो. या वर्षी मंदिराभवती मागील बाजूस अंथरलेली टोकदार गीट्टी भक्तासाठी डोकेदुखी ठरत आहे.कारण देवदर्शनासाठी आलेला भाविकभक्त अनवाणी पायाने दर्शनासाठी आता गेला असताना दर्शना नंतर बाहेर आल्यानंतर अनवाणी पायाने टोकदार गिट्टीवरून जाताना नाहक त्रास करावा लागत आहे.मंदिर कमिटीने किमान मुख्य रस्ता ते मंदिरा पर्यंत सुव्यवस्थित रस्ता तयार करणे आवश्यक आहे.
    या पुर्वी काही दिवसांपूर्वी जिंतूरच्या वयस्कर भक्ताचा चिखलामुळे आपला एक पाय फॅक्चर झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
    किमान भविष्यात मंदिर समितीने भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये अशा सुखसुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भक्तां तर्फे होत आहे.
    चौकट
    गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवर्षी पोलिस प्रशासनातर्फे गृहरक्षकांची पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते.पण भोगाव (देवी) येथे नियुक्त महिला पोलिस कर्मचाऱ्यांची हुल्लडबाजी दिसून आली.देवी दर्शनासाठी मंदिरा पाठीमागील बाजूस असलेल्या 7 ते 8 लोखंडी कड्याना फेऱ्या मारून दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था असल्याने भाविकभक्त शांततेने चालत असताना तेथे मागील दाराजवळ नियुक्त महिला पोलिस कर्मचारी आपल्या खुर्चीवर बसून जोरजोराने पळा- पळा देवी दर्शनाची वेळ संपत आहे म्हणून सांगत सुटल्याने भक्तजन पळत सुटल्याने काही वयस्कर महिला कर्मचारी यांची पळता पळता दमछाक झाली. व सुदैवाने या धावपळीत महिलावर्ग एकमेकींच्या अंगावर पडता पडता सुदैवाने सावरल्या. व मोठे दुर्घटना घडली नाही.
    तसेच मंदिर कमिटीने मंदिर ठिकाणी नियुक्त व्हॅलेंटियर तरुणाई हातातील काठी आदळत भक्तांना पुढे लोटत होते.या वेळी त्यांच्याकडून कोणताही सामांजसपणा दाखविला जात नव्हता. या सर्व प्रकारामुळे भाविकभक्तात नाराजी पसरल्याचे दिसून आले.
    @चौकट@
    सर्व भक्तांसाठी मंदिर कमिटी तर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात विशेषतः पोलिस प्रशासनाने महिला कर्मचारी वर्गाने भक्ता साठी त्रास होणार नाही.असे कर्मचारी तेथे नियुक्त करावे अशी मागणी आर्वी (कुंभारी) येथील भक्त रामप्रसाद भालेराव यांनी केली आहे.
    @चौकट@
    पार्किंग साठी सुविधा नसताना आर्थिक भुर्दंड
    मुख्य रस्त्याच्या बाजूस मोकळ्या जागेत दुचाकी वाहनासाठी प्रतिवाहन 20 रू आकारणी जरी ठेवली असली तरी तेथे आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. जरी आर्थिक भार लावला तरी तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!