साई कॉम्पुटर तर्फे शिक्षक दिन साजरा व प्राध्यापकांचा केला सत्कार

साई कॉम्प्युटर, जिंतूर तर्फे विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन साजरा – प्राध्यापकांचा केला सन्मान
जिंतूर – येथील साई कॉम्प्युटर, जिंतूर तर्फे शिक्षक दिनानिमित्त शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालय, जिंतूर येथील सर्व प्राध्यापकांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास मुटकुळे सर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य खंडेराव भिसे, BCS-BCA कॉलेजच्या प्राचार्य मुंडे मॅडम, तसेच अभिनव वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्षस्थानी डॉ. विजयकुमार पव्हने सर उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी शिक्षकांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्या समाजातील भूमिकेवर प्रकाश टाकला. “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे,” असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
साई कॉम्प्युटर जिंतूर तर्फे सर्व शिक्षकांना कृतज्ञता व्यक्त करत “शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना जीवनात यशाचा मार्ग सापडतो. आम्ही सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानतो व त्यांच्या आरोग्य, आयुष्य आणि कार्याला शुभेच्छा देतो,” असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास साई कॉम्प्युटर संचालक महेश देशमुख, पत्रकार शेख अहमद, सचिन रायपत्रीवार, रितेश ससे, सय्यद मुजाहिद, पंकज सोनवणे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.