Uncategorized

जिंतूर तालुका व सेलू मंडळातील वालूर व कुपटा मंडळे अतिवृष्टीत समाविष्ट करा,:मा.आ. विजय भांबळे यांचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना साकडे

जिंतूर तालुका व सेलू तालुक्यातील वालूर व कूपटा मंडळे अतिवृष्टित समविष्ट करा
मदत,पुणर्वसन मंत्री मकरंद पाटीला यांना मा.आ. विजय भांबळेंचे साकडे

जिंतूर :- दि.२५ सप्टेंबर, परभणी दौऱ्यावर आलेले मदत व पुनर्वसन मंत्री मा ना श्री मकरंद आबा पाटील साहेब यांची भेट घेत अतिवृष्टी मध्ये संपूर्ण जिंतूर तालुका व सेलू तालुक्यातील वालूर व कुपटा हि मंडळे सामाविष्ट करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत करण्याची विंनती मा.आ.विजयराव भांबळे व शिष्ट मंडळाने आज सावली विश्राम गृह परभणी येथे भेटून केली. चालू वर्षातील जुलै, ऑगष्ट, सप्टेंबर- २०२५ या मागील तीन महिन्यामध्ये जिंतूर व सेलू तालुक्यात सततचा पाऊस, ढगफुटी व अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, हळद, ऊस व फळबाग ई. पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अक्षरशः पीके पाण्यात मुळे सडून गेली आहेत त्यामुळे शेतातील उभे पीके नष्ट होत आहेत. शेतकरी यांनी बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी यावर प्रचंड खर्च केलेला आहे. हे सर्व नुकसान बघून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या अस्मानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मागील चार दिवसापूर्वी शासनाने परभणी जिल्ह्याला अतिवृष्टी घोषित करून निधी मंजूर केला आहे, परंतु, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका व सेलू तालुक्यातील वालूर व कुपटा हि दोन मंडळे अतिवृष्टी मधून वगळली आहेत. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील व सेलू तालुक्यातील वालूर व कुपटा मंडळातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून जिंतूर तालुका संपूर्ण व सेलू तालुक्यातील वालूर व कुपटा हि मंडळे अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत करा म्हणून लेखी निवेदन दिले आहे.
यावेळी विश्वनाथ राठोड, अजयराव चौधरी,लक्ष्मणराव बुधवंत, मुरलीधर मते, बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, विठ्ठलराव घोगरे, कृष्णकांत देशमुख, केशवराव बुधवंत, गणेशराव इलग,पुरुषोत्तम पावडे, चंद्रकांत गाडेकर, गजानन वऱ्हाड, राजेश चव्हाण, मनोज राऊत,खंडेराव आघाव, रामेश्वर जावळे, अर्जुन वजीर, शंकर जाधव, कैलास महाराज देशमुख, जिवन आवटे, शरदराव अंभूरे, अविनाश मस्के, जगदीश शेंद्रे,राहुल कणकुटे, करून नागरे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!