मा. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सुनील भोंबे व मुन्ना पारवे यांची मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 51 हजाराची मदत

मा.आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सुनील भोंबे व मुन्ना पा मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 51 हजार रुपयांचा धनादेश प्रदान
जिंतूर –मा आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात व हर्ष उल्हासात बोर्डीकर कुटुंबाचे खंदे समर्थक पक्ष कार्यकर्ते,पदाधिकारी व्यापारी व सर्वसामान्य नागरिक व त्यांचा चाहता वर्ग मोठ्या उत्साहात साजरा करतात.
पण यावर्षी सबंध राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला असून या घडीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत मा.आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही आपल्या सर्व कार्यकर्त्यास दरवर्षी प्रमाणे या वर्षी माझा वाढदिवस साजरा करताना राज्यात ओला दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला असून शेतीचे बेसुमार नुकसान झालेले आहे.
तेव्हा या आर्थिक संकटात आपण सबंध राज्यातील सुजाण नागरिकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व ताकतीने उभे राहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
तेव्हा माझा वाढदिवस कोणताही अनावश्यक व अनाठाइ खर्च न करता तो खर्च टाळून शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आव्हान बोर्डीकर साहेबांनी केलेले असताना जिंतूर तालुक्यातून मुख्यमंत्री सहायता निधीस प्रतिसाद भेटत आहे.
या आव्हानाला प्रतिसाद देत ज्योती कन्स्ट्रक्शनचे सुनील भोंबे व मुन्ना पारवे यांनी प्रत्येकी 51000 रु.ची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. या वेळी धनादेश प्रदान करतांना मा.आमदार रामप्रसाद बोर्डीकर व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती.
या सामाजिक उपक्रमाचे सुनील भोंबे व अभिजीत उर्फ मुन्ना पारवे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





