भाजप व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी प्रमोद कोकडवार

भाजपच्या व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप कोकडवार यांची निवड
जिंतूर–भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी परभणी जिल्हाध्यक्ष पदावर जिंतूर ता व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप सोपानराव कोकडवार यांची निवड करण्यात आली.
नुकतेच परभणी जिल्हा पदाधिकारी निवड कार्यक्रमात पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या परभणीच्या पालकमंत्री जन सपंर्क कार्यालयात भाजपा नेते लोकसभा प्रमुख माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्यावेळी जिंतूर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नूतन जिल्हा सरचिटणीस डॉ पंडित दराडे जिंतूर मंडळ अध्यक्ष विलास भंडारे , वसंतराव शिंदे, अशोक बुधवंत आदी उपस्थित होते.
निवड झाल्याबद्दल व्यापारी महासंघांचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी अभिनंदन केले असून त्यांचे जिंतूर येथील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.