जिंतूरात महा रक्तदान शिबिर,वृक्षारोपण व गोमतेचे पूजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढ दिवस साजरा

जिंतूरात महा रक्तदान शिबीर,वृक्षारोपण व गोमतेचे पूजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढ दिवस साजरा
जिंतूर—गुणीरत्न वाकोडे)–महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुठेही बॅनरबाजी न करता, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महा रक्तदान शिबिर व पालकमंत्री मा.नामदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर-सेलू विधानसभेतील जिंतूर मंडळामध्ये सकाळी गोमाता पूजन,श्रीमती कस्तुरबा गांधी विद्यालयात 55 वृक्षांचे वृक्षरोपण व नंतर जिंतूर आयसीयू जिंतूर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास ह.भ.प.संदीप महाराज शर्मा,जिंतूर सेलू विधानसभा प्रमुख डॉ.पंडित दराडे मा.नगराध्यक्ष सचिन गोरे मा.नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख जिंतूर मंडळाचे अध्यक्ष विलास भंडारे,भाजपा तालुकाध्यक्ष गोविंद थिटे, मंडळ महामंत्री ऍड अशोक बहिरट,शिवाजीराव कदम, प्रदीप जाधव, बालाजी पोरवाल, विजय जाधव, शैलेश कोठेकर, गुज्जर मोहिते, राजेश राठोड, रमेश अण्णा संगेकर,महिला मोर्चाचे अध्यक्ष वैष्णवी कुलकर्णी,अशोक बुधवंत, माधव दराडे,नगरसेवक रहमान भाई, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष फिरोज भाई, मा. नगरसेवक अब्दुल मुखिद, सुमेध सूर्यवंशी, उमेश दराडे, मुक्तेश भंडारे, एड गोपाळ रोकडे, ह भ प टाक महाराज, शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थिनी,भाजपा पदाधिकारी व रक्तदाते उपस्थित होते.
वृक्षारोपण,,महारक्तदान तालुक्यातील गोशाळेतील गोमतेचे पूजन आदी विविध कार्यक्रम भाजप पदाधिकारी व कार्यकृत्या कडून राबवून एकूणच लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढ दिवस उस्फुर्त पणे साजरा करण्यात आला.