जि.प.शाळेत प्रवेश घ्या—घरपट्टी नळ पट्टी माफ–सरपंच सौ.मिनाताई बुधवंतची घोषणा
पांगरी ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम

जि.प.शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांचा पालकांना घरपट्टी, पाणीकर माफ
—सरपंच—मिनाताई बुधवंत
पांगरी ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम
जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायती तर्फे गावातील विद्यार्थ्यांनी गावातीलच स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवत्त व्हावे या उदात्त हेतूने पांगरी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ.मिनाताई केशवराव बुधवंत यांनी असा सामूहिक ग्रामपंचायत ठराव घेतला की गावातील विद्यार्थ्यांनी जर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेतला तर त्यांच्या पाल्यांच्या घराच्या नळ पट्टीचा व घर पट्टीचा कर दोन वर्षां साठी 100 टक्के माफ केला जाईल.
या बाबत सविस्तर माहिती अशी प्रसिद्धी केलेल्या पत्रका नुसार ग्रामस्थ आपल्या पाल्यांना (मुला-मुलींना) अंगणवाडीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी मध्ये प्रवेश घेतील त्यांना ग्रामपंचायत पांगरीच्या वतीने दोन वर्षाकरिता घरपट्टी व नळपट्टी कर पूर्णपणे माफ राहील व दुसरी ते सातवीपर्यंत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या (मुला-मुलींना) आईच्या वडिलांच्या नावावरील मिळकतीची एक वर्षाची घरपट्टी व नळपट्टी कर पूर्णपणे माफ राहील अशी कौतुकास्पद घोषणाच
पांगरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्याने ग्रामस्थात पांगरी ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
तेंव्हा आपल्या पाल्याचा अन्य कुठेही प्रवेश न घेता स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावा असे आव्हान सरपंच सौ.मिनाताई केशवराव बुधवंत यांनी शेवटी केले आहे.
ठरावा दरम्यान उपसरपंच सिताराम किशनराव चांदणे,ग्रामसेवक आदोडे व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.