
भोगाव (देवी) येथील उर्दू शाळेत पुढील वर्गास मान्यता द्या
राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांस साकडे
जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)—-तालुक्यातील भोगाव (देवी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस उर्दू माध्यम नैसर्गिक वाढविणे इयत्ता नववी व दहावीचा वर्ग उघडण्याची मान्यता देण्यात यावी असे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक यांनी गटशिक्षणाधिकारी जिंतूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद केंद्रीय उर्दू शाळेपासून जवळची जिल्हा परिषद शाळा जिंतूर या तालुक्याच्या ठिकाणी बारा किमी अंतरावर असून भोगाव या गावची लोकसंख्या 1935 आहे. सध्या या शाळेचे विद्यार्थी परिस्थितीनुसार तालुका व जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवेश घेतात तर काही ची परिस्थिती हलकीची असल्याने त्यांचे पालक जिंतूर तालुक्याच्या ठिकाणी बारा किमी असल्याने प्रवेश घेत नाही निवेदनात अशीही म्हटले आहे की मुलीची शहरी भागाला जाणे येणे करण्यास पालकांची मानसिकता राहत नाही.
भोगाव येथील उर्दू शाळेत नववी पर्यंत 116 विद्यार्थी संख्या ही 2023- 24 होती.
तर नवीन प्रवेश घेणाऱ्या 25 मुले,तर 11 मुलींची प्रवेश घेण्याची इच्छा असूनही त्या हालाखीच्या परिस्थितीमुळे तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकत नसल्याने दरवर्षी मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याची पालकांनी सांगितले.
निवेदनावर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भोगाव (देवी) व जिल्हा परिषद केंद्रीय उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आहेत.