राष्ट्रसंत स्वच्छता दूतांचे कीर्तनातून समाजप्रबोधन

अन्नदान व नामस्मरणाने जीवन सार्थक -राष्ट्रसंत स्वच्छता दूत साईनाथ महाराज यांचे प्रतिपादन.
जिंतूर –(गुणीरत्न वाकोडे)–पुंगळा येथील एकनाथराव देशमुख यांच्या घरी दिनांक 28 जून शनिवार रोजी महाराष्ट्राचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत श्री सद्गुरु साईनाथ महाराज माहुरकर यांच्या यांच्या मधुर वाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना मनुष्याने अन्नदान आणि नामस्मरण केल्याने कलियुगात जीवन सार्थक होते. असे असे प्रतिपादन केले .
यावेळी कार्यक्रमास जिंतूर तालुका प्रेसचे अध्यक्ष मंचकराव जगताप तर प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार नंदू संतान, भाऊराव पाटील हडसणीकर, एस एस पाटील, आबासाहेब देशमुख हे उपस्थित होते.यावेळी राष्ट्रसंत श्री सद्गुरू
साईनाथ महाराज यांनी मार्गदर्शन करताना मनुष्याने स्वच्छतेची कास धरावी, आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपले घर आणि आपला गाव स्वच्छ ठेवावा. कसल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता हातात झाडू घेऊन आपला गाव आपणच स्वच्छ केला पाहिजे .यामुळे रोगराई पसरणार नाही. तसेच प्रत्येक जन्मला आलेल्या स्त्री-पुरुषांनी आपल्याला घडेल तसे अन्नदान व नामस्मरण केल्यास आपल्या जिवाचा कलियुगामध्ये उधार करता येतो .अनेक साधुसंत सांगून गेले आहेत .की कलियुगात अन्नदान आणि नामस्मरणा शिवाय मनुष्य सुखी, समाधानी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने दररोज अन्नदान व नामकरण करावे. यातच आपल्या देहाचा उदार होऊ शकतो. असे मार्गदर्शन केले. त्यांनी अनेक उदाहरणं देऊन जीवन सुख- समृद्धी करण्यासाठी साधुसंतांच्या सानिध्यातराहिले पाहिजे .त्यामुळे भगवंतांची प्राप्ती होते. जगामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत. त्यांना फाटा देऊन जे चांगले आहे .तेच अंगीकृत करावे. व जे वाईट आहे ते सोडून द्यावे. निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. कोणी सांगतोय म्हणून काहीही करू नये असे मार्गदर्शन केले. यावेळी पुंगळा पंचकोशीतील अनेक दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील दत्त भक्तांच्या वतीने पिंगलेशवर महादेव मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनाथ जगताप, संजय जगताप, अशोकराव जगताप, एकनाथराव जगताप, यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील नागरिक ,महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते.