
पठाण रहेमत खान यांचे निधन
@मेंदूतील रक्तस्त्राव ठरला जीवघेणा
जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे–शहरातील आमदार कॉलोनी येथे राहणारे मनमिळाऊ स्वभावाचे आटो कन्सल्टंट पठाण रहेमत खान समीउल्ला खान यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवार 27 जून रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 40 वर्षे इतके होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, बहीण आणि एक भाऊ आहे. त्यांच्या पार्थिवावर मुस्लीम रीतिरिवाजप्रमाणे शहरातील जामा मस्जिद काब्रिस्तानमध्ये दुपारी 2:30 वाजता दफनविधी करण्यात आला. याप्रसंगी सर्वच क्षेत्रातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.