
लालपरीचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
प्रावाश्यांना मिठाई,फुल देऊन केले स्वागत
जिंतूर–येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने जिंतूर आगारा तर्फे ७७ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रवाशांचे पुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले.
लालपरी ही ग्रामीण भागातील जिवनवाहिनी ही आधुनिकतेच्या मार्गाने प्रवास करत आहे.आता लालपरी मध्ये चागल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू करत आहे. लालपरीत मोबाईल चार्जर, काही घटना टाळल्या साठी मोठ्या खिडक्या, महिलांना आरक्षण, दिव्यागंन नागरिकांना सीटची सुविधा , माजी सैनिक,पत्रकार, यांना आरक्षित जागा ठेवण्यात आली.
जेष्ठ नागरिक 50% अमृत जेष्ठ नागरिक 100% व महिलांना 50% तिकिट भाड्यामध्ये सवलती मिळत आहे त्या मुळे नागरिकांचा एसटीचा प्रवास म्हणजेच सुखाचा प्रवास समजला जातो. आज लालपरीचा वर्धापन दिनानिमित्त जिंतूर आगारा तर्फे प्रवाशांचे स्वागत करून पेढे वाटताना आगार प्रमुख आनंद चव्हाण, स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे, वाहतूक निरीक्षक शरद पाटील, ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, वाहतूक लिपिक गजानन घुगे,लिपिक मदन मुंढे,गुणीरत्न वाकोडे, गजानन गीते,शिल्पा टारपे,सुनील घुगे,चालक ठाकाजी काळे आदींची उपस्थिती होती.
@@@@@@@@@@
एसटीला ७७ व्या दिनानिमित्त प्रवाशांचे हाल पहाता लालपरी ही आधुनिक होऊन आपल्या सेवेत आणली. बस मध्ये आरक्षित जागा आहे. त्यावर तेच नागरिक बसावे या कडे वाहकांनी व आगार प्रमुख यांनी याची अंमलबजाणी करून जागा उपलब्द करून द्यावी. दिव्यांगन नागरी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, आमदार, व महिला साठी राखीव जागेवर दुसरे न बसता आरक्षितांना प्राधान्य देण्यात यावे.
@@@@@@@@@@@@@@
–सचिन रायपत्रीवार प्रवासी महासंघ तालुकाध्यक्ष जिंतूर