स्व. चामणीकर गुरुजींच्या स्मरणार्थ मोफत अभ्यासिकेची सुरुवात

गेट-टुगेदर चा वायफळ खर्च टाळून
मोफत अभ्यासिकेची सुरुवात
@1993 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी राबविला स्तुत्य उपक्रम
@ स्व.चामणीकर गुरुजींच्या स्मरणार्थ मोफत अभ्यासिकेची सुरुवात
जिंतूर – स्व. चामणीकर गुरुजी यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्याच भुजंगवाडी गल्लीतील वास्तूमध्ये स्व. रंगनाथराव चामणीकर गुरुजी मोफत अभ्यासिकेचे उद्घाटन आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी प्राचार्य श्रीधर भोंबे, भागवत सांगळे आणि विद्यार्थी प्रतिनिधी मदन दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंडिका दास जोशी, सिताराम घुले, खापरखुंटिकर, तरवटे, सानप, एन जी गायकवाड या गुरुजनांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रकाश डूबे यांनी केले यावेळी त्यांनी जिंतूर येथील 1993 च्या दहावीच्या मित्र-मैत्रिणी एकत्रित येऊन अभ्यासू गरजवंत मुलांसाठी ही अभ्यासिका सुरू केली असून गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार असल्याचे तसेच विद्यार्थ्यांना वाचनासाठी अभ्यासक्रमातील पुस्तके तसेच इतर ग्रंथ सुद्धा उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी भागवत सांगळे यांनी हा एक स्तुत्य सामाजिक उपक्रम असून यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा तसेच अभ्यासकेसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी अभ्यासिकेसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल भावना चामणीकर यांचा आणि आर्थिक सहयोग देणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची चामणीकर तर आभार प्रदर्शन ॲड मनोज सारडा यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पा चामणीकर, प्रकाश डूबे,अभिजीत देशमुख, संदीप माहूरकर, अरविंद तरटे, हरिभाऊ बाभळे, गजानन फाले, दत्ता काळे, कैलास झाडे, शंकर चव्हाण, सतीश बुलबुले आणि इतर सर्व मित्रांनी प्रयत्न केले.
@असा झाला गेट-टुगेदर@
सुरुवातीला तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून पर्यावरण पूरक सुरुवात केली. सर्व मित्रांचा परिचय घेण्यात आला.
समविचारी मित्रांनी मनमोकळा संवाद साधून समाज उपयोगी उपक्रमाबद्दल विचार मंथन केले. दरवर्षी गेट-टुगेदर चा खर्च सामाजिक उपक्रम साठी वापरण्याचा ठराव घेण्यात आला.




