Uncategorized

अखेर “त्या” प्रकरणातील जामीन मंजूर

ऍड.सुनील बुधवंत यांनी मांडली भक्कम बाजू

 

ऍड.सुनील बुधवंतने मांडलेल्या भक्कम बाजुमुळे जामीन मंजूर

पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

जिंतूर. सरकारी कामात अडथळा आणून पोलीस कर्मचाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात अक्षय सूर्यवंशी आणि राधे यांच्याविरुद्ध दि. 27 मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यावर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी, अक्षय सूर्यवंशी याने 28 मे रोजी ॲड. सुनिल बुधवंत यांच्यामार्फत परभणी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

सुनावणीदरम्यान ॲड. बुधवंत यांनी युक्तिवाद केला की, अर्जदाराने गुन्हा केलेला नसून त्याला खोट्या रीतीने गोवण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम 109 हेतुपुरस्सर लावण्यात आले असून, फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्यास गंभीर दुखापत झालेली नाही. अर्जदार प्रतिष्ठित नागरिक असून तपासाला सहकार्य करण्यास तयार आहे, त्यामुळे जामीन मंजूर करावा.

विरोधात, सहाय्यक सरकारी वकिलांनी सांगितले की, आरोपीने गंभीर गुन्हा केला असून, तो फरार आहे. तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून त्याच्यावर प्रलंबित गुन्हे असल्याने जामीन फेटाळावा. त्यावर ॲड. बुधवंत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘प्रभाकर तिवारी विरुद्ध उत्तर प्रदेश’ प्रकरणाचा दाखला देत, “काही गुन्हे प्रलंबित असणे हा जामीन नाकारण्याचा आधार होऊ शकत नाही,” असे निरीक्षण सादर केले.

दोन्ही बाजू ऐकून, न्यायालयाने प्रत्यक्ष कोठडीची आवश्यकता नसल्याचे नमूद करत, केवळ प्रलंबित गुन्ह्यांमुळे स्वातंत्र्यावर बंधन घालता येणार नाही, असे सांगून अक्षय सूर्यवंशीला दि. 19 जून रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button