Uncategorized

नगर पालिकेत घरकुल योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण!!! चक्क अभियंत्या तर्फे चिरीमिरीची मागणी

मेहराज कुरेशीची लेखी तक्रार!!!

घरकुल योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहन

@ नगर परिषदेच्या विविध घरकुल योजने साठी अभियंत्या कडून चक्क पैश्याची मागणी

मेहराज कुरेशीची लेखी तक्रार

जिंतूर–गुणीरत्न वाकोडे)–
नगरपरिषद अंतर्गत पंतप्रधान घरकुल योजनेत सध्या कार्यरत असलेले अभियंता हे लाभार्थ्यांचे मागील नाव पुढे करणे, घर न बांधता रक्कम देणे, अपूर्ण काम असले तरी पूर्ण झाल्याचे दाखविणे, नोकरी वाल्यांना घरकुलाचे लाभ देणे, त्रुटीच्या फाईल चीरिमेरी घेऊन मंजुरी करणे, व दलाला मार्फत आलेल्यांचे काम करणे असे अनेक प्रकरण अभियंता मलिक यांनी केल्याचे आरोप मेहराज कुरेशी यांनी केले आहे.
मेहराज कुरेशी यांनी एका निवेदन द्वारे तहसील कार्यालय जिंतूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याकडे झालेल्या भ्रष्टाचाराचा चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button