Uncategorized

महान बौद्ध राजा सम्राट अशोकांची 2329 वी जयंती साजरी

भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–
आज रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जितूरच्या वतिने तालुकाध्यक्ष मोहन घनसावंत व महिला अध्यक्ष सुनिताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सरचिटणिस खेडकर साहेब याच्या प्रमुख उपस्थितित महान बौद्ध राजा सम्राट अशोक यांची 2329वि जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख व्याख्याते प्रा. रमेश गुडदे सर आणि भिक्खू रत्नदिपजी थेरो संभाजी नगर तसेच भिक्खू संघ रत्न यानी आधुनिक भारताला सम्राट अशोकाच्या लोककल्याणकारी शासनव्यवस्थेची गरज आहे असे उपस्थिताना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुञसचालन बौद्धाचार्य शिवाजी लाटे आणि आभार प्रदर्शन बौद्धाचार्य आनंदराव वाकळे यांनी केले.
त्या अगोदर कमांडर महेद्र बनसोडे आणि समता सैनिक दल यानी धम्म ध्वजास सलामी दिली.बौद्धाचार्य विकास अण्णा मोरे, बौद्धाचार्य गणेश खिल्लारे सर आणि बौद्धाचार्य भीमराव निकाळजे यानी ञिरत्न वंदना घेतली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सिमाताई वाकळे, आशाताईं वाकळे, आशाताईं खिल्लारे, प्रिती पाटील सोनवणे ताई, विशाल घनसावंत, नामदेव प्रधान, धनराज घनसावंत विक्रम घनसावंत नितीन वाकळे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button